क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा खेळाडूंमध्ये खटके उडत असतात. हे आपण अनेकदा पाहिले आहे. मात्र, काही वेळा या गोष्टी थेट समोर येत नाहीत. असे असले, तरीही अशा गोष्टी फार काळ लपून राहत नाहीत. अशातच भारतीय संघातील दिग्गज खेळाडूंबद्दल खळबळजनक बातमी समोर येत आहे. ते दोन खेळाडू इतर कुणी नसून रोहित शर्मा आणि विराट कोहली हे आहेत. हे दोघेही 2008पासून भारतीय संघाकडून खेळत आहेत. दोघांमध्ये चांगली बाँडिंगही आहे. मात्र, एक वेळ अशी होती, जेव्हा त्यांच्यात खूपच मतभेद होते. त्यामुळे भारतीय संघ दोन गटात विभागला गेला होता. त्याविषयीचा खुलासा एका पुस्तकात करण्यात आला आहे. चला सविस्तर जाणून घेऊया…
विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Kohli And Rohit Sharma) यांच्यात काहीतरी बिनसल्याची अनेक बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, विराट आणि रोहितने कधीच याला दुजोरा दिला नव्हता. मात्र, भारतीय संघाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर (R Sridhar) यांनी त्यांच्या ‘कोचिंग बियाँड- भारतीय क्रिकेट टीम के साथ मेरे दिन’ या पुस्तकात खुलासा केला आहे.
विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यातील वादाच्या बातम्या 2019मध्ये खेळण्यात आलेल्या वनडे विश्वचषकादरम्यान आल्या होत्या. यानंतर 2021च्या शेवटी विराटला भारतीय संघाच्या वनडे कर्णधारपदावरून हटवल्यानंतरही या बातम्यांनी जोर धरला होता. श्रीधर यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितले आहे की, कशाप्रकारे विराट आणि रोहित यांच्यात गोष्टी बिघडल्या होत्या. मात्र, त्यावेळचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली होती.
श्रीधर यांनी 2019च्या विश्वचषकानंतर एका घटनेची आठवण काढत त्यांनी पुस्तकात सांगितले की, “2019 विश्वचषकानंतर पत्रकार परिषदेत ड्रेसिंग रूमबाबत खूप काही बोलण्यात आले होते. आम्हाला सांगण्यात आले की, रोहित गट आणि विराट गट आहे. तसेच, कुणीतरी कुणाला सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. जर तुम्ही अशाप्रकारच्या गोष्टींना संधी देता, तर गोष्टी खराब होऊ शकतात. विश्वचषकानंतर आम्ही टी20 मालिकेसाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलो आणि तिथे रवीने दोघांनाही जवळ बोलावले.”
माजी प्रशिक्षकाने म्हटले की, “रवीने दोघांनाही म्हटले की, भारतीय क्रिकेटला चांगले बनवण्यासाठी दोन्ही खेळाडूंनी एकमेकांसोबत राहणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर जे सुरू आहे, ते चालूद्या. मात्र, तुम्ही दोघे या संघाचे सर्वात वरिष्ठ खेळाडू आहात. त्यामुळे अशाप्रकारच्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. तुम्ही हे सर्व मागे सोडत एकत्र यावे, अशी माझी इच्छा आहे.”
सध्या विराट आणि रोहित दोघांमध्ये चांगली बाँडिंग आहे. तसेच, दोघेही मैदानावर एकमेकांशी हसत खेळत राहतात. याचा प्रत्यय क्रिकेट सामने पाहताना येतो. (former coach r sridhar revealed in his book there was a rohit camp and a virat camp in team india)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूने घेतली निवृत्ती, पोस्ट शेअर करत दिली माहिती
Video: एकेकाळी गोलंदाजांना धडकी भरवणाऱ्या मलिंगाने वाजवला पियानो; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘क्या बात है’