टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर टीम इंडियामध्ये अनेक बदल पाहायला मिळाले. टी20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावल्यानंतर संघाचा मुख्यप्रशिक्षक प्रमुख राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला होता. बीसीसीआयने द्रविडनंतर गौतम गंभीरला संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक म्हणून श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियासोबत आहे, टीम इंडियाचा हेड कोच म्हणून गंभीरचा हा पहिलीच मालिका आहे. परंतु त्याआधी द्रविडने एका खास संदेशासह गंभीरकडे जबाबदारी सोपवली.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 मालिकेला आजपासून (27 जुलै) सुरुवात होणार आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी राहुल द्रविडने खास संदेश देत गौतम गंभीरकडे कोचिंगची जबाबदारी सोपवली. गौतम गंभीर लॅपटॉपसमोर येऊन बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मग तो एक बटण दाबतो आणि राहुल द्रविडचा स्पेशल मेसेज सुरू होतो. तो असा..
“हॅलो गौतम, या जगातील सर्वात रोमांचक कामात तुझे स्वागत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून माझा कार्यकाळ संपून 3 आठवडे झाले आहेत.” यानंतर द्रविडने बार्बाडोसच्या फायनलचा आणि मुंबईच्या विजयाच्या परेडचा उल्लेख करत या आठवणी अविस्मरणीय असल्याचे सांगितले.
द्रविड पुढे म्हणाला, “काहीही गोष्टींपेक्षा, मी माझ्या संघासोबत असताना केलेल्या आठवणी आणि मैत्री जपत राहीन. तु भारताच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे, मला तुझ्यासाठी अशीच इच्छा आहे.” पुढे, माजी मुख्य प्रशिक्षकाने संघातील खेळाडूंबद्दल बोलले आणि गौतम गंभीरला शुभेच्छा दिल्या.
पाहा व्हिडिओ-
𝗣𝗮𝘀𝘀𝗶𝗻𝗴 𝗼𝗻 𝘁𝗵𝗲 𝗯𝗮𝘁𝗼𝗻 𝘄𝗶𝘁𝗵 𝗰𝗹𝗮𝘀𝘀 & 𝗴𝗿𝗮𝗰𝗲! 📝
To,
Gautam Gambhir ✉From,
Rahul Dravid 🔊#TeamIndia | #SLvIND | @GautamGambhir pic.twitter.com/k33X5GKHm0— BCCI (@BCCI) July 27, 2024
द्रविडच्या संदेशाला प्रत्युत्तर देताना म्हणाला, “हा संदेश ऐकून मी स्तब्ध झालो आहे. या संदेशाला माझ्याकडे शब्द नाहीत. कारण हा जो संदेश आला आहे तो महान खेळाडूंपैकी आहे. द्रविडने भारतीय संघासाठी खूप मोलाचे योगदान दिला आहे. मी सहसा कधी भावनिक होत नाही. पण हा द्रविडचा संदेश मला भावनिक केले आहे”.
हेही वाचा-
टाॅस निभावणार महत्त्वाची भूमिका; पाहा श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्याचे खेळपट्टीचा अहवाल
IND vs SL: कहरच म्हणा! श्रीलंकेविरुद्ध मोहम्मद सिराजची आकडेवारी पाहून, तुम्ही पण व्हाल थक्क!
पदकाचा दुष्काळ संपवण्यास खेळाडू सज्ज! पहिल्याच दिवशी या खेळातून खाते उघडण्याची अपेक्षा