सध्या दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्स भारतात आला आहे. नुकताच तो सर्वप्रथम बंगळुरूला गेला होता. इथे त्याने सांगितले होते की, तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या खेळाडूंना आगामी आयपीएल 2023 स्पर्धेसाठी पाठिंबा देण्यासाठी आला आहे. आता तो मुंबईत पोहोचला, जिथे त्याने आपल्या चाहत्यांसोबत गली क्रिकेट खेळले. यादरम्यानचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच, या व्हिडिओला चाहत्यांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत ‘मिस्टर 360’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबी डिविलियर्स (AB De Villiers) याच्या आजूबाजूला काही मुलं दिसत आहेत. तसेच, तो गल्लीत प्लॅस्टिकचे स्टंप लावून प्लॅस्टिक चेंडूवर खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत एका युजरने कॅप्शनमध्ये “गोट (सर्वकालिन सर्वोत्तम) खेळाडू मुंबईत,” असे लिहिले आहे. यामध्ये त्याने डिविलियर्सचा हॅशटॅग लावून त्याला टॅगही केले आहे.
GOAT 🐐 in Mumbai #Abdevillers @ABdeVilliers17 pic.twitter.com/HtoG9u1VUu
— Prashant _17𓃵 (@ineffable_1817) November 7, 2022
खरं तर, एबी डिविलियर्स याने मागील वर्षी म्हणजेच आयपीएल 2021नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तसेच, आगामी आयपीएल 2023 (IPL 2023) या हंगामात तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा खेळाडू म्हणूनही खेळणार नाही. मात्र, मुंबईत पोहोचल्यानंतर त्याने सर्वप्रथम सचिन तेंडुलकर याची भेट घेतली, ज्याची माहिती त्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर दिली.
एबी डिविलियर्स याने घेतली सचिन तेंडुलकर याची भेट
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि एबी डिविलियर्स यांची भेट झाली. या भेटीबद्दल सांगताना डिविलियर्स म्हणाला की, “मी आज सचिन तेंडुलकर याच्यासोबत काही तास घालवले. असा विचार केला होता की, मी त्याची मुलाखत घेण्यासाठी जात आहे. मात्र, त्याला फक्त ऐकत राहणे आणि त्याच्याकडून शिकण्यासोबतच सर्व संपले. सचिनसोबत काय अनुभव होता. दिलेल्या वेळेबद्दल धन्यवाद मास्टर ब्लास्टर.”
याच्या एक दिवस आधी डिविलियर्सनेही इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सचिन तेंडुलकरसाठी लिहिले होते की, “सचिन तेंडुलकरशी भेटण्याची प्रतीक्षा करताना मी उत्साहाने भरलो आहे. मी त्याला भेटण्यासाठी नेहमीच तयार असतो. ज्याप्रकारे त्याने आपल्या खेळाच्या दिवसात मैदान आणि मैदानाबाहेर स्वत:ला सिद्ध केले, ते अविश्वसनीय होते. त्याच्या निवृत्तीनंतरही काहीच बदलले नाही. तसेच, आताही माझ्यासोबत तो जगातील लाखो लोकांना प्रेरित करत आहे.”
आता आगामी आयपीएल 2023साठी डिविलियर्स आरसीबीच्या खेळाडूंचा उत्साह कशाप्रकारे वाढवतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (former cricketer ab de villiers played gully cricket in mumbai video viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुर्दैवच अन् काय! 2021मध्ये पदार्पण करणाऱ्या ‘या’ 5 खेळाडूंना विसरले राहुल द्रविड, ढुंकूनही नाही बघत
VIDEO: पाकिस्तानी अँकरने ओलांडली हद्द, लाईव्ह शोमध्ये वसीम अक्रमला म्हटले ‘नॅशनल धोबी’