---Advertisement---

तिसऱ्या टी२० दरम्यान ईडन गार्डनवर गांगुलीबरोबर दिसला माजी क्रिकेटर, विजयानंतर ‘या’ शब्दात टीम इंडियाचं केलं अभिनंदन

---Advertisement---

रविवारी (२१ नोव्हेंबर) भारतीय संघाने तिसऱ्या टी२० सामन्यात न्यूझीलंडचा ७३ धावांनी पराभव केला आहे. भारतीय संघाने संघाने न्यूझीलंडविरुद्धची मालिका ३-० ने जिंकली आहे. याआधी भारतीय संघाने मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना भारताने ७ गड्यांच्या मोबदल्यात १८४ धावा केल्या होत्या. रोहितने ५६ धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १११ धावा करून सर्वबाद झाला.

भारतीय संघाचा नवखा कर्णधार रोहित शर्मा मालिकावीर ठरला आहे. या सामन्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि आमदार मनोज तिवारीने भारतीय संघाचे अभिनंदन करत खास फोटो शेअर केले आहेत.

मनोज तिवारीने ट्विट करत म्हटले आहे की, ‘ईडन गार्डन भारतीय संघाला कधीच निराश करत नाही. न्यूझीलंड संघाला टी२० मध्ये हरवणे सोपे काम नसते. रोहित शर्माने उत्कृष्ट कर्णधारपद भूषवले तसेच भारतीय संघाने जबरदस्त प्रदर्शन केले.’ या सोबतच मनोज तिवारीने बीसीसीआय अध्यक्ष सैराव गांगुली यांच्या सोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि त्याला कॅप्शन देत म्हटले आहे की, ‘प्रिन्स ऑफ कोलकाता यांच्यासोबत.’

कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. भारतीय संघाने या मैदानावर चार टी२० सामने खेळले आहेत, ज्यात दोन सामने जिंकले आहेत. एक सामना रद्द करण्यात आला होता, तर एका सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या मैदानावर भारतीय संघाने शेवटचा टी२० सामना २०१८ साली वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. या सामन्यात भारताने ५ गडी राखून विजय मिळवला होता. कोलकाताचे मैदान भारतीय संघासाठी नेहमीच यशदायी ठरले आहे.

भारतीय संघाने २० षटकांत ७ बाद १८४ धावा केल्या. भारताकडून रोहित शर्माने ३१ चेंडूत ५६ धावा आणि इशान किशनने २१ चेंडूत २९ धावा केल्या. श्रेयस अय्यरने २५ आणि व्यंकटेश अय्यरने २० धावा केल्या. हर्षल पटेलनेही ११ चेंडूत १८ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने २७ धावांत ३ बळी घेतले. ईश सोढी, ऍडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेंट बोल्ट यांना १-१ विकेट घेण्यात यश मिळाले.

न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिलने अर्धशतक झळकावत संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. त्याने ३६ चेंडूत ५१ धावा केल्या. ४ चौकार आणि ४ षटकार मारले. मात्र संघातील अन्य कोणताही खेळाडू खेळपट्टीवर टिकाव धरू शकला नाही. न्यूझीलंड संघातील ८ खेळाडू दहाच्या आकड्याला स्पर्श करू शकले नाहीत. संपूर्ण संघ १७.२ षटकांत १११ धावांत गारद झाला. हर्षल पटेलनेही २ बळी घेतले.

न्यूझीलंडवर भारताचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. तत्पूर्वी, न्यूझीलंडवर भारताचा सर्वात मोठा विजय ५३ धावांचा होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘आमचे पाय जमिनीवरच राहू देऊ’, न्यूझीलंडविरुद्ध विजयानंतर राहुल द्रविड यांची मार्मिक प्रतिक्रिया

भावाने नादचं केलाय थेट! नियमित कर्णधार म्हणून पहिल्याच टी२० मालिकेत रोहित बनला ‘मॅन ऑफ द सिरीज’

टी२० मालिकेत प्रतिस्पर्धींना क्लिन स्विप करणं नव्हे सोप्पं काम! भारताने ‘इतक्यांदा’ केलीय ही अवघड कामगिरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---