खेळाडू मैदानावर एकमेकांविरुद्ध कितीही आक्रमकपणा दाखवत असतील, तरीही मैदानाबाहेरही त्यांचे संबंध तसेच असावे असे गरजेचे नसते. काही खेळाडू हे मैदानावर आणि मैदानाबाहेरही चांगले मित्र असतात. याची उदाहरणं अनेक आहेत. असेच एक उदाहरण आहे भारत आणि पाकिस्तान संघातील दोन माजी खेळाडूंचं. भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि गोलंदाज बिशन सिंग बेदी यांनी करतारपूर येथे पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार इंतिखाब आलम यांची भेट घेतली.
खरं तर, करतारपूर येथे पोहोचल्यानंतर बिशन सिंग बेदी (Bishan Singh Bedi) यांनी इंतिखाब आलम (Intikhab Alam) यांच्याशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर इंतिखाब आलम यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली, तेव्हा ते बेदींना भेटण्यासाठी लागोरवरून करतारपूर येथे पोहोचले. दोन्ही खेळाडू एकमेकांशी भेटण्यासाठी एवढे उत्सुक होते की, इंतिखाब यांनी 140 किलोमीटर अंतर कापत आपल्या जुन्या मित्राची भेट घेतली.
पाकिस्तानी पत्रकाराने शेअर केला व्हिडिओ
एका पाकिस्तानी पत्रकाराने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर या भेटीचा फोटो शेअर केला. या फोटोत बिशन सिंग बेदी हे त्यांच्या कुटुंबासोबत इंतिखाब आलम यांच्यासोबत दिसत आहेत. यादरम्यान बेदी आणि आलम यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद बहरल्याचे दिसते. तसेच, त्यांच्या चेहऱ्यावर समाधानी झाल्याच्या भावना स्पष्ट दिसत आहेत. या फोटोत चार महिलाही दिसत आहेत. इंतिखाब आलम यांनी पाकिस्तान संघाचे कर्णधारपद भूषवले होते. त्यांनी 47 कसोटी सामने आणि 4 वनडे सामने खेळले आहेत. इंतिखाब यांनी 1969 ते 1975 यादरम्यान 17 कसोटी सामन्यात पाकिस्तानचे कर्णधारपदाची जबाबदारी पेलली होती. त्यांनी 4 वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यातही नेतृत्व केले होते.
Former #Indian cricketer Bishan Singh Bedi met former Pakistan captain Intikhab Alam at #KartarpurSahib. @BishanBedi had expressed his desire to meet Alam, after which Bedi came to #Pakistan through #KartarpurCorridor & Intikhab Alam reached #Kartarpur from #Lahore to meet him. pic.twitter.com/G7LTddoo18
— Ghulam Abbas Shah (@ghulamabbasshah) October 4, 2022
Intikhab Alam & Shafqat Rana, two former cricketers & friend of @BishanBedi sb greeting Bishan Bedi in Kartarpur Sahib,a Sikh holy shrine in Pakistan.Dosti beyond borders 😊💕 pic.twitter.com/D7vixFjba1
— Aalia Rasheed (@aaliaaaliya) October 5, 2022
पाकिस्तानी क्रिकेटपटूंसाठी बनवले होते पक्वान
बिशन सिंग बेदी हे फिरकी गोलंदाज राहिले आहेत. त्यांनी 67 कसोटी सामन्यात 266 विकेट्स घेतल्या. 13 वर्षांहून दीर्घ कारकीर्दीत बेदी हे भारतीय फिरकी गोलंदाजी फळीचे भाग होते. त्यात इरापल्ली प्रसन्ना, श्रीनिवास वेंकटराघव आणि भगवत चंद्रशेखर यांचा समावेश आहे. बेदी यांचे पाकिस्तानी क्रिकेटपटूंसाठीचे प्रेम नवीन नाही. भारतीय माजी कर्णधार आणि फिरकीपटू बेदी यांनी ऑस्ट्रेलियात एकदा जहीर अब्बास, जावेद मियांदाद, मुदस्सर नजर आणि पाकिस्तानच्या इतर क्रिकेटपटूंना जेवणासाठी आमंत्रित केले होते. यामध्ये त्यांनी जवळपास 25 पाहुण्यांसाठी पंचपक्वानाचे जेवण बनवले होते.
या क्रिकेटपटूंमधील हे प्रेम पाहून चाहतेही भलतेच खुश झाले आहेत. त्यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिप्तीच्या मंकडींग प्रकरणावर न्यूझीलंड क्रिकेटरची प्रतिक्रिया; म्हणतेय, ‘ते नियमात, पण मी अजिबात…’
वॉर्नर आणि स्टार्कने जिंकवून दिला दुसरा टी-20 सामना, पाहुण्या वेस्ट इंडीजला ऑस्ट्रेलियाकडून क्लीन स्वीप