क्रिकेटप्रेमी सध्या कुठल्या टी20 स्पर्धेची वाट पाहत असतील, तर ती इंडियन प्रीमिअर लीग होय. आयपीएल 2024 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी आहे, पण या स्पर्धेची क्रेझ आतापासूनच वाढली आहे. कारण, दुबईत 19 डिसेंबर रोजी आयपीएल 2024 लिलाव पार पडणार आहे. या लिलावापूर्वी न्यूझीलंडचा माजी दिग्गज फलंदाज आणि इंग्लंडच्या कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम याने आयपीएलमधील पहिल्या शतकाची आठवण काढली आहे.
ब्रेंडन मॅक्युलमचे विधान
ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum) याने आयपीएल 2008 (IPL 2008) या उद्घाटनाच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात वादळी शतक ठोकले होते. त्यावेळी तो कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा भाग होता.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाच्या इनोव्हेशन लॅब लीडर मीटमध्ये सामील झालेल्या मॅक्युलमने आयपीएलमधील पहिल्या शतकाची आठवण काढली. तो म्हणाला, “त्या क्षणाने माझे आयुष्य बदलून टाकले होते. मी न्यूझीलंडसाठी फक्त एक क्रिकेटपटू होतो, जिथे वास्तवात मला कुणी ओळखत नव्हते की, मी काय केले आहे, मी कुठून आहे आणि काय करू शकतो, पण त्या दिवसाने मला व्यासपीठ मिळवून दिले, ज्याने माझे आयुष्य बदलून टाकले.”
नाबाद 158 धावांची खेळी
न्यूझीलंडच्या या विस्फोटक फलंदाजाने 2008च्या उद्घाटनाच्या आयपीएल हंगामात केकेआरकडून आरसीबीविरुद्ध खेळताना 73 चेंडूत नाबाद 158 धावांची झंझावाती खेळी केली होती. त्याच्या या खेळीत 10 चौकार आणि 13 षटकारांचा समावेश होता. त्याने ही खेळी बंगळुरूतच खेळली होती. त्याच्या या खेळीनंतर लीग क्रिकेटमध्ये एक वेगळीच रंजकता आली, जी आजवर कायम आहे.
खरं तर, ब्रेंडन मॅक्युलम दीर्घ काळ आयपीएल खेळत राहिला. त्याने केकेआर (KKR) संघाव्यतिरिक्त इतर संघाचेही प्रतिनिधित्व केले. तो आरसीी संघाकडूनही खेळला. मात्र, तो संघात असूनही आरसीबी (RCB) संघ किताब जिंकू शकला नाही. अशात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की, आयपीएल 2024 (IPL 2024) हंगामात आरसीबी संघ पहिला-वहिला किताब जिंकू शकतो की नाही. (former cricketer brendon mccullum reminisces on 158 against rcb in first ever ipl match)
हेही वाचा-
INDvsSA: भारताविरुद्धच्या टी20 अन् वनडे मालिकेतून बावुमाला का बसवलं बाहेर? हेड कोचने सांगितलं मोठं कारण
आफ्रिकन कोचचा डी कॉकविषयी धक्कादायक खुलासा! म्हणाला, ‘वर्ल्डकपनंतर त्याला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून…’