भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यंदाच्या चॅम्पियन्स ट्राफीवर (ICC Champions Trophy 2025) आपले नाव कोरले. यादरम्यान रोहित शर्मा सलग दोन आयसीसी ट्राॅफी जिंकणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला. भारताने 2024 मध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली टी20 विश्वचषक जिंकला. पण यंदाच्या चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनल सामन्यापूर्वी, रोहितच्या निवृत्तीबद्दलच्या चर्चांना उधाण आले होते. पण विजेतेपद जिंकल्यानंतर रोहितने सांगितले केली की तो निवृत्त होणार नाही. आता माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarakar) यांनी या मुद्द्यावर आपले मौन सोडले आहे. या मुद्द्यावर वेंगसरकर संतापले.
वेंगसरकर यांनी पीटीआयला सांगितले की, “मी ज्योतिषी नाही. 2027च्या विश्वचषकापर्यंत अजूनही बरेच सामने खेळायचे आहेत. रोहितच्या फॉर्म आणि फिटनेसवर बरेच काही अवलंबून असेल. सध्या काहीही सांगणे योग्य नाही पण तो कर्णधार आणि खेळाडू दोन्ही म्हणून उत्तम राहिला आहे. मला माहित नाही की लोकांनी (त्याच्या निवृत्तीबद्दल) अंदाज का लावला, ते अनावश्यक आहे. त्याच्या दर्जाच्या खेळाडूला त्याच्या भविष्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार असला पाहिजे.” (Dilip Vengsarkar’s statement on Rohit Sharma’s retirement)
पुढे बोलताना वेंगसरकर म्हणाले, “सध्या तो ज्या पद्धतीने खेळत आहे ते अद्भुत आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये 3 द्विशतके झळकावली आहेत. मी त्याच्याबद्दल आणखी काय सांगू? विराट आणि रोहितसारखे खेळाडू हे मोठ्या सामन्याचे खेळाडू आहेत, स्टेज जितका मोठा असेल तितका चांगला परफॉर्मन्स. संघाच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्वाचे आहे. त्याच्या उपस्थितीमुळे विरोधी संघाचे मनोबल खचते.”