आत्तापर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश केला आहे. आत्ताही अनेक क्रिकेटपटू भारताच्या राजकारणात (Indian Cricketers in Politics) सक्रिय आहेत. यात आता आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचा समावेश झाला आहे. माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगिया (Dinesh Mongia) आता राजकारणात प्रवेश करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये सामील झाला आहे. मंगळवारी (२८ डिसेंबर) दिनेश मोंगियाने दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
राजकारणात पाऊल ठेवताना मोंगियाने म्हटले आहे की भारतीय जनता पक्षात (Bharatiya Janata Party) प्रवेश करून पंजाबमधील लोकांची सेवा करण्यासाठी उत्सुक आहे. तसेच त्यांनी असेही म्हटले की, आज देशाच्या विकासासाठी भाजपव्यतिरिक्त अजून चांगला पक्ष कोणता नाही. मोंगिया यांचे पक्षाच्या नेत्यांकडून स्वागत झाले.
अधिक वाचा – क्रिकेटची खेळपट्टी ते राजकारणाचा फड गाजवणारे भारतीय शिलेदार, विश्वविजेत्या खेळाडूचाही समावेश
दोन वर्षांपूर्वी घेतली होती निवृत्ती
दिनेश मोंगियाने २ वर्षांपूर्वीच १७ सप्टेंबर २०१९ रोजी सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५७ वनडे सामने खेळले असून १ शतक आणि ४ अर्धशतकांसह २७.९५ च्या सरासरीने १२३० धावा केल्या आहेत. तसेच १४ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने १ आंतरराष्ट्रीय २० सामने देखील खेळला असून ३८ धावा केल्या आहेत. मात्र, मोंगियाला कारकिर्दीत कसोटीसाठी भारतीय संघात स्थान मिळवता आले नाही.
साल २००१ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या मोंगियासाठी झिम्बाब्वेविरुद्ध गुवाहाटीमध्ये केलेली १५९ धावांची खेळी अविस्मरणीय राहिली. या खेळीत त्याने १७ चौकार आणि १ षटकार मारला होता. एवढेच नाही, तर २००३ सालच्या विश्वचषकाच्या भारतीय संघात देखील मोंगियाला भारतीय संघात संधी मिळाली होती.
https://twitter.com/ANI/status/1475737060702969858
विशेष म्हणजे मोंगियाने २०१४ साली ‘कबाब में हड्डी’ या चित्रपटात काम देखील केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आणखी एक भारतीय क्रिकेटपटू बनला बाबा! मोहित शर्माला प्राप्त झाले ‘पुत्ररत्न’
“… म्हणून आमचे गोलंदाज भरकटले”; एन्गिडीने सांगितले खराब गोलंदाजीचे कारण
व्हिडिओ पाहा – विरोधी संघातील गोलंदाजांना Golden Watches भेट देणारा Captain






