Ashish Nehra fed duck to Gautam Gambhir: भारतीय क्रिकेट संघाला 2011 विश्वचषक अंतिम सामना जिंकून देण्यात गौतम गंभीर याने मोलाचा वाटा उचलला होता. गंभीर त्याच्या शानदार फलंदाजीसाठी ओळखला जायचा. अशात गंभीरने आयपीएल 2014 स्पर्धेतील खराब सुरुवातीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. गंभीर त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार होता. त्यावेळी तो स्पर्धेच्या सुरुवातीला सलग 3 वेळा डक पद्धतीने झाला होता. याच्याशी संबंधिक एक मजेशीर किस्सा गंभीरने सांगितला. यावेळी त्याने आशिष नेहरा याचेही नाव घेत म्हटले की, नेहराने त्याला बदक खाऊ घातले होते.
गंभीरला खावे लागले होते बदक
गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने मजेशीर किस्स्याची आठवण काढली. एका पॉडकास्टमध्ये बोलताना तो म्हणाला की, “जेव्हा मी सलग 3 वेळा डक्स (शून्यावर बाद) झाला होता. त्यानंतर मला आशिष नेहराने बदक खाण्यास सांगितले होते.” तो पुढे बोलताना म्हणाला की, “हा एक मजेशीर किस्सा आहे. जेव्हा मी तीन डक्स झालो, तेव्हा त्यानंतर आमचा सामना चेन्नईमध्ये कोणत्यातरी संघाविरुद्ध होता. त्यावेळी आशिष नेहराही त्याच हॉटेलमध्ये होता. आम्ही संघाच्या हॉटेलमध्येच डिनर करण्यासाठी खाली पोहोचलो, जिथे चार-पाच दररोजचे खेळाडू एकत्र डिनर करत होते. आम्ही असेच बसलो असताना नेहराने डक (बदक) मागवले. कुणी काय-काय मागवले, पण त्याने बदकची ऑर्डर केली. नेहरा मला म्हणाला की, ‘खाऊन घे.’ त्यावर मी म्हणालो की, मी नाही खात राव. यानंतर नेहरा म्हणाला की, ‘इथे खा नाही तर उद्या बनू शकतो.'”
पुढच्या सामन्यात बनवली एक धाव
गंभीरने हा किस्सा पुढे नेत सांगितले की, “नेहराने डक ऑफर केल्यानंतर मी खूपच विचारात पडलो की, यार मी खातच नाही. मी विचार केली की, चला चव घेऊन पाहूयात. पुढच्याच दिवशी मी सामन्यात 1 धाव केली. कमीत कमी डक नाही झालो. यानंतर नेहराने मला मेसेज केला आणि म्हटले की, ‘पाहिलं, मी म्हणालो होतो ना, कमीत कमी तू चव घे, डक होणार नाही.'”
केकेआरचा मार्गदर्शक बनला गंभीर
खरं तर, गौतम गंभीर याला आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वीच केकेआर संघाचा मार्गदर्शक म्हणून नेमले आहे. केकेआरसाठी खेळणाऱ्या गंभीरने म्हटले की, त्याने फ्रँचायझीसोबत आपल्या भावनिक संबंधांमुळे हा निर्णय स्वीकारला. खरं तर, गंभीर 2011 ते 2017 यादरम्यान फ्रँचायझीचा भाग होता. त्याने यादरम्यान आपल्या नेतृत्वाखाली संघाला 2 हंगामांचा (2012 आणि 2014) किताबही जिंकून दिला होता. (former cricketer gautam gambhir revealed a funny incident of ipl 2014 when ashish nehra fed duck to him)
हेही वाचा-
‘IPLने Impact Player Rule रद्द करावा, भारतीय फलंदाज…’, माजी दिग्गजाने का दिला असा सल्ला? घ्या जाणून
Shocking: धोकादायक खेळपट्टीमुळे BBL 2023मधील सामना रद्द, नेमकं काय घडलं?