---Advertisement---

कानाखाली मारल्याचे विसरून श्रीसंत IPL 2023मध्ये हरभजनसोबत करणार ‘हे’ काम, मिळाली खास जबाबदारी

On: शुक्रवार, मार्च 24, 2023 8:01 PM
S-Sreesanth-And-Harbhajan-Singh
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023चा महारणसंग्राम येत्या 31 मार्चपासून सुरू होणार आहे. या मोठ्या टी20 लीगची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. खरं तर, यावेळी चाहत्यांना सामन्याचाच नाही, तर समालोचनाचाही भरपूर आनंद घेता येणार आहे. कारण, यावेळी समालोचन पॅनेलमध्ये भारतीय संघाचे दोन माजी दिग्गज हरभजन सिंग आणि एस श्रीसंत यांचा समावेश असणार आहे. हरभजनने श्रीसंतला चापट मारली होती, त्यामुळे दोन्ही खेळाडूंमधील ‘चापट’ वाद भलताच चर्चेत होता.

माध्यमांतील वृत्तांंनुसार, हरभजन सिंग आणि एस श्रीसंत (Harbhajan Singh And S Sreesanth) आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत समालोचन करताना दिसतील. स्टार स्पोर्ट्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे. पुन्हा एकदा दोन्ही खेळाडूंना एकत्र पाहणे चाहत्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

https://twitter.com/StarSportsIndia/status/1638831675160530946

नेमकं काय घडलेलं?
हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि एस श्रीसंत (S Sreesanth) हे तेव्हा चर्चेत आले होते, जेव्हा आयपीएल 2008 (IPL 2008) स्पर्धेत दोघांमध्ये वाद झाला होता. खरं तर, हरभजनने श्रीसंतला चापट मारली (Harbhajan Slapped Sreesanth) होती. मात्र, हरभजनने त्यानंतर श्रीसंतची माफी मागितली होती. हरभजन त्यावेळी मुंबई इंडियन्सचा, तर श्रीसंत किंग्स इलेव्हन पंजाबचा (आताचा पंजाब किंग्स) भाग होता.

हरभजनने या घटनेनंतर माफी मागत म्हटले होते की, “जे काही घडले, त्यात माझी चूक होती. मीच सर्वात मोठी चूक केली होती. मला खूपच लाज वाटली. मला माझी चूक सुधारायची आहे. मी त्याच्याबाबत विचार करतो, तेव्हा मला आजही वाईट वाटते. मला वाटते की, त्याला चापट मारण्याची काहीही गरज नव्हती.”

https://twitter.com/ShivamO33696481/status/1638966562895060992

हरभजन सिंग आणि एस श्रीसंत हे भारताचे मोठे खेळाडू आहेत. त्यांनी अनेक सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे, हरभजन आणि श्रीसंत हे दोघेही 2007 सालच्या टी20 आणि 2011 सालच्या वनडे विश्वचषकातील विजेत्या भारतीय संघाचा भाग होते. आता हे दोघेही आयपीएलमध्ये समालोचन करून चाहत्यांचे मनोरंजन करणार आहेत. यासाठी चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. (former cricketer harbhajan singh and s sreesanth will do commentary in ipl both remember for slapgate controversy occur in 2008)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिलं प्रेम सोडून ‘तिने’ धरला क्रिकेटचा हात, WPL स्पर्धेत गुगलीने दिग्गज खेळाडूंना देतेय त्रास
यह मुंबई मेरी जान! एमआयचे नवे ऍंथम रिलीज, दाखवली शहराची ओळख, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---