भारतीय संघ आणि गुजरात टायटन्स संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल आयपीएल 2023 स्पर्धेत चांगल्या फॉर्ममध्ये आहे. चाहते गिलची तुलना विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांसारख्या दिग्गजांशी करत आहेत. मात्र, कपिल देव यांनी या गोष्टीला नकार दिला आहे. कपिल देव यांनी शुबमन गिलला चेतावणी दिली आहे. चला काय म्हणालेत कपिल देव जाणून घेऊयात…
शुबमन गिल (Shubman Gill) मागील काही काळापासून भारतीय संघासाठी जबरदस्त प्रदर्शन करत आहे. याव्यतिरिक्त तो यावर्षी आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याने या हंगामात 800 हून अधिक धावा केल्या आहेत. अनेकांनी त्याची तुलना विराट कोहली (Virat Kohli), सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्याशी केली आहे. मात्र, कपिल देव (Kapil Dev) या गोष्टीशी सहमत नाहीत.
काय म्हणाले कपिल देव?
कपिल देव यांनी गिलच्या शानदार प्रदर्शनावर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “भारतीय क्रिकेटमध्ये सुनील गावसकर आले, सचिन तेंडुलकर आले आणि नंतर राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग आणि नंतर विराट कोहली. शुबमन ज्याप्रकारे फलंदाजी करत आहे, त्यावरून असे वाटते की, तो यांच्याच पावलांवर पाऊल टाकत आहे.”
“मी सध्या गिलला सचिन-गावसकरांच्या या श्रेणीत ठेवणार नाही. माहितीये त्याच्यात प्रतिभा आहे, पण मोठ्या खेळाडूंशी तुलना करणे आता योग्य नाही. मी त्याला आणखी एका हंगामात खेळताना पाहू इच्छितो. कारण, गोलंदाजांना एक किंवा दोन हंगामानंतर फलंदाजांच्या कमजोरीविषयी समजते. जर कोणत्याही फलंदाजाने सलग 3-4 हंगाम चांगले खेळले, तर आपण म्हणू शकतो की, तो महान आहे.”
पुढे बोलताना कपिल पाजी असेही म्हणाले की, “शुबमन गिलसाठी सध्या चांगला काळ आहे. मात्र, मी हे पाहू इच्छितो की, जेव्हा त्याचा फॉर्म जाईल, तेव्हा तो कशाप्रकारे पुनरागमन करतो. अनेक क्रिकेटपटू सुरुवातीला चांगली कामगिरी करतात, परंतु नंतर अपयशी ठरतात. सूर्यकुमार यादवला पाहा, चांगल्या फॉर्मनंतर तो सातत्याने गोल्डन डक झाला. मात्र, त्याने पुनरागमन केले होते.”
शुबमन गिलची कामगिरी
आयपीएल 2023 स्पर्धेतील शुबमन गिल याच्या कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 16 सामने खेळताना 851 धावा केल्या आहेत. त्यात त्याने 3 शतके आणि 4 अर्धशतके ठोकली आहेत. विशेष म्हणजे, तो फक्त एकदा शून्यावर बाद झाला आहे. यादरम्यान 129 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्याचा स्ट्राईक रेटदेखील 150हून अधिक आहे. गिल ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वात पुढे आहे. आता हंगामातील अंतिम सामना गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडणार आहे. या सामन्यात शुबमन कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (former cricketer kapil dev on shubman gill read his statement here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL फायनलमध्ये धोनीचा घाबरवणारा रेकॉर्ड! एकाच कर्णधाराकडून 3 वेळा हारलाय ‘थाला’, गंभीरनेही दिलेली मात
सीएसके-गुजरात सामन्यात पाऊस आला तर? जाणून घ्या कोणत्या संघाला मिळणार विजेतेपद