---Advertisement---

अखेर ऋतुराज झाला प्रेमाच्या जाळ्यात क्लीन बोल्ड! ‘या’ मिस्ट्री गर्लशी बांधणार लग्नगाठ

On: रविवार, मे 28, 2023 5:10 PM
---Advertisement---

भारतीय संघ तसेच चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड हा या आयपीएल हंगामात उत्कृष्ट कामगिरी करताना दिसतोय. चेन्नईने आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. या अंतिम सामन्यासाठी ऋतुराज गायकवाड याची स्टॅन्ड बाय म्हणून भारतीय संघात निवड झालेली. मात्र त्याने आता इंग्लंडला जाण्यास नकार दिला असून त्यामागील कारण समोर आले आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) जून 3-4 रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. त्याची होणारी पत्नी कोण आहे याबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, उत्कर्षा नावाची त्याची मैत्रीण त्याची वधू असू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

https://www.instagram.com/p/CseVHjltxld/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==

ऋतुराज व उत्कर्षा यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर चालू हंगामात तिने काही सामन्यांना हजेरी देखील लावलेली. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर केलेल्या एका पोस्टमध्ये ऋतुराजने उत्कर्षाचा उल्लेख केला होता. त्यामुळे हेच पती-पत्नी असणार अशी शक्यता जोरदार वर्तवली जात आहे.

दुसरीकडे ऋतुराज याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यातून माघार घेतल्यामुळे मुंबईचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याला संधी मिळाली आहे. यशस्वी याने संपूर्ण देशांतर्गत हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी केलेली. त्यासह आयपीएल 2023 मध्ये राजस्थानसाठी खेळताना या हंगामात त्याने 600 पेक्षा जास्त धावा केल्या. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामन 7 जून पासून ओव्हलच्या मैदानावर सुरू होईल. यावेळी भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान असेल. मागील वेळी भारताला अंतिम सामन्यात न्यूझीलंडने पराभूत केले होते.

(Ruturaj Gaikwad Future Wife Mystery Girl Utkarsha Wedding Planned At 3 June)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL फायनलमध्ये धोनीचा घाबरवणारा रेकॉर्ड! एकाच कर्णधाराकडून 3 वेळा हारलाय ‘थाला’, गंभीरनेही दिलेली मात
सीएसके-गुजरात सामन्यात पाऊस आला तर? जाणून घ्या कोणत्या संघाला मिळणार विजेतेपद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---