आयपीएल (IPL 2025)च्या हंगामापूर्वीच राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) रजत पाटीदारला (Rajat Patidar) आरसीबी संघाचा कर्णधार केले आहे. तसेच असे प्रश्न उपस्थित होत होते की, विराट कोहली (Virat kohli) पुन्हा एकदा आरसीबी संघाची जबाबदारी स्वीकारू शकतो. पण आरसीबी संघ व्यवस्थापनाने युवा फलंदाज रजत पाटीदारवर विश्वास ठेवून त्याला संघाचा कर्णधार केले आहे.
यानंतर भारतीय संघाचे माजी खेळाडू कृष्णमाचारी श्रीकांत यांनी विराट कोहली आणि आरसीबीच्या नवीन कर्णधार यांच्याबद्दल प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी सांगितले की विराट कोहलीला राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार बनवण्यात आले नाही.
कृष्णमाचारी श्रीकांत म्हणाले की, आरसीबीने रजत पाटीदारला आपल्या संघाचा कर्णधार केले आहे आणि या निर्णयाला नक्कीच विराटने पाठिंबा दिला असेल. तसेच विराट कोहलीने स्वत:च कर्णधार होण्यासाठी नकार दिला. आता विराटने कर्णधारपद का सोडले हे प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर कृष्णमाचारी श्रीकांत यांच म्हणणं आहे की, विराटला त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचे होते म्हणून त्याने कर्णधार होण्यास नकार दिला. त्यामुळे रजत पाटीदारला कर्णधार पद मिळालं आहे. तसेच कृष्णमाचारी श्रीकांत यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले आहे की, विराटनेच कर्णधार पदासाठी नकार दिला असेल.
कृष्णमाचारी श्रीकांत नंतर म्हणाले की, “विराट कोहलीने आरसीबी व्यवस्थापनाला सांगितले असेल की, मला फलंदाजीवर जास्त लक्ष केंद्रित करायचे आहे. आरसीबीच्या कर्णधारपदी रजत पाटीदार चांगला खेळाडू आहे. रजतची आयपीएलमधील चांगली कामगिरी पाहून त्याच्याकडून जास्त अपेक्षा नाहीत. तसेच 2007 मध्ये जेव्हा आम्ही धोनीला टी20 विश्वचषकाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले होते तेव्हा त्याच्याकडून आणि संघाकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. त्यामुळे कर्णधार म्हणून रजत पाटीदारकडून फारशा अपेक्षा नाहीत, तो स्वत: निर्णय घेईल, पण विराट कोहलीचा सल्ला घेत राहील.”
हेही वाचा-
रोहित शर्मा सेना लवकरच दुबईला रवाना! चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिली लढत बांग्लादेशशी
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: 5 फिरकीपटूंचा समावेश योग्य की चूक? अश्विनची प्रतिक्रिया…
ब्लॅक कॅटची मैदानात एन्ट्री, पाकिस्तानच्या पराभवाची नांदी? न्यूझीलंडचा शानदार विजय!






