श्रीलंका संघाने क्रिकेट जगताला अनेक दिग्गज क्रिकेटपटू दिले आहेत. त्यामध्ये लसिथ मलिंगा या वेगवान गोलंदाजाचाही समावेश होतो. माजी वेगवान गोलंदाज मलिंगाने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकापेक्षा एक विक्रम नावावर केले आहेत. याव्यतिरिक्त त्याने जगातील सर्वात मोठी टी20 लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगमध्येही आपली वेगळी छाप सोडली आहे. सध्याच्या काळात तो एक खेळाडू म्हणून आयपीएलचा भाग नाहीये. मात्र, तो गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून राजस्थान रॉयल्स संघासोबत जोडला गेला आहे. आयपीएल 16 या हंगामात मलिंगा राजस्थानचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करणार आहे. अशातच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एका मुरलेल्या संगीतकाराप्रमाणे लसिथ मलिंगा पियानो वाजवताना दिसत आहे.
खरं तर, लसिथ मलिंगा (Lasith Malinga) याने सप्टेंबर 2021 महिन्यात क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. मलिंगा त्याच्या यॉर्करसाठी चाहत्यांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. आयपीएल 15 हंगामात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने त्याला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवडले होते. आयपीएल 2022 (IPL 2022) संघाने शानदार कामगिरीदेखील केली होती. तसेच, संघाने अंतिम सामन्यापर्यंत मजलही मारली होती. मात्र, गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने विजय मिळवत पहिले-वहिले विजेतेपद पटकावले होते.
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धा सुरू होण्यात अजून काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. अशातच फ्रँचायझीने त्यांच्या गोलंदाजी प्रशिक्षकाचा म्हणजेच लसिथ मलिंगाचा पियानो व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “गुलाबीमध्ये योग्य स्टंप्स नोट्स हिट केल्या जात आहेत? आपण हे यापूर्वीही पाहिलंय.”
https://www.instagram.com/reel/CoPG4l4pn58/?utm_source=ig_embed&ig_rid=c85b1054-1a69-444e-99f3-91afa8fac9c2
या व्हिडिओवर चाहते जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. तसेच, त्याच्या या कलेची प्रशंसाही करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “क्या बात है सरजी”
लसिथ मलिंगाची आयपीएल कारकीर्द
विशेष म्हणजे, लसिथ मलिंगा त्याच्या आयपीएल कारकीर्दीमध्ये फक्त एका फ्रँचायझीकडून खेळला आहे. ती फ्रँचायझी म्हणजेच मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) होय. त्याने त्याच्या कारकीर्दीत आयपीएलच्या 9 हंगामात एकूण 122 सामने खेळले. यादरम्यान त्याने 19.80च्या सरासरीने तब्बल 170 विकेट्सही घेतल्या. विशेष म्हणजे, यावेळी त्याचा इकॉनॉमी रेट हा 7.14 इतका होता. (former cricketer lasith malinga playing piano rajasthan royals shared video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘शुबमनशी जुळवून दे’ म्हणणाऱ्या ‘त्या’ मुलीचे पोस्टर टिंडरने आख्ख्या नागपूरात लावले, एकदा पाहाच
ब्रेकिंग! मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूने घेतली निवृत्ती, पोस्ट शेअर करत दिली माहिती