इंडियन प्रीमिअर लीग 2023चा घाट पुढील महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 31 मार्चपासून घातला जाणार आहे. आयपीएल 2023च्या रणसंग्रामातील पहिली लढत ही चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्याची सर्व क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे, एमएस धोनी हा पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्स संघासाठी खेळताना दिसणार आहे. आयपीएल 2023च्या वेळापत्रकाची घोषणा झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज मॅथ्यू हेडन यांनी धोनीविषयी मोठे विधान केले आहे.
काय म्हणाले हेडन?
माध्यमांशी बोलताना चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएल खेळलेले मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) म्हणाले की, “हा खूपच शानदार क्षण असेल. मागील वर्षी धोनी आयपीएल खेळला होता. मागील आयपीएलच्या शेवटी त्याने स्पष्ट केले होते की, तो पुढील हंगामात खेळणार आहे. निश्चितरीत्या आता मला वाटते की, त्याच्या आयपीएल कारकीर्दीचा शेवट होत आहे. त्याने खूप जास्त वेळ दिला आहे. त्यामुळे हे फक्त चाहत्यांसाठीच नाही, तर सीएसके फ्रँचायझीसाठीही महत्त्वाचा हंगाम असेल.”
खरं तर, एमएस धोनी (MS Dhoni) याने मागील वर्षी संकेत दिले होते की, त्याची आयपीएल कारकीर्द आता लवकरच संपणार आहे. लिलावादरम्यान सीएसकेने बेन स्टोक्स (Ben Stokes) याला सर्वाधिक बोली लावत खरेदी केले होते. 16.25 कोटी रुपये खर्च करत सीएसकेने स्टोक्सला ताफ्यात सामील कले होते. असे म्हटले जाऊ शकते की, सीएसकेचा नवीन कर्णधाराचा शोध संपला आहे.
That's how excited we are! 🫂
🚁 Liftoff – March 3️⃣1️⃣#TATAIPL #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/Vf7yfQkA7b— Chennai Super Kings (@ChennaiIPL) February 17, 2023
आयपीएल 2023 साठी चेन्नई सुपर किंग्स संघ-
एमएस धोनी (कर्णधार), डेवॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, सुभ्रांशू सेनापती, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगारगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, काईल जेमिसन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, सिमरजीत सिंग, दीपक चाहर, प्रशांत सोलंकी, महेश थीक्षणा, शेख रशीद, भगत वर्मा, अजय मंडल. (Former Cricketer ms dhoni is close of his ipl career said matthew hayden ahead of ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जन्मभूमी दिल्लीत विराट खेळतोय अखेरचा कसोटी सामना? फक्त दोन दिवस आणि वर्षभराची मेहनत पणाला
एका ऑस्ट्रेलियनकडून शिकूनच ऑस्ट्रेलियाला चोपतोय अक्षर, स्वतः केला खुलासा