भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी याने काही दिवसांपुर्वीच क्रिकेट क्षेत्रातून राजकारणात पाऊल ठेवले आहे. तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे (टीएमसी) तिकिट मिळवत बंगाल विधानसभा निवडणुकीत एकतर्फी विजय मिळाल्यापासून मनोज तिवारी राजकारणात खूपच सक्रिय दिसून येत आहे.
याच दरम्यान आमदार तिवारी पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतीत अधिक प्रमाणात वाढ झाल्याने आंदोलन करताना दिसून आला आहे. मनोज तिवारी एका विशिष्ट पद्धतीने हे आंदोलन करत आहे. या आंदोलनात तो चक्क क्रिकेट किट घालून सहभागी झाला आणि जनतेला संबोधित केले. या आंदोलनाचा लाईव्ह व्हिडिओ मनोज तिवारीने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केला आहे.
अधिकृत फेसबुक पेजवर हा लाईव्ह व्हिडिओ शेअर करत मनोज तिवारीने लिहिले की, ‘पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या असामान्य दरवाढीविरोधात निषेध व आंदोलन. ही लढाई माझी आहे, ही लढाई तुमची आहे, ही लढाई सर्व भारतीयांची आहे.’ ममता बॅनर्जी सरकारमधील मनोज तिवारीला क्रीडा व युवा राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.
2021 मध्ये मनोज तिवारीने अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेसच्या राजकीय पक्षात प्रवेश केला आणि नंतरच्या वर्षी पश्चिम बंगाल विधानसभेतून निवडून आला. मनोज तिवारीने ग्रेटर कोलकाता भागातील शिबपूर इथून निवडणूक लढवत 32 हजाराहून अधिक मतांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता.
https://www.facebook.com/watch/?v=537372990744471
मनोज तिवारी उजव्या हाताचा फलंदाज आहे, जो अधूनमधून लेग ब्रेक गोलंदाजीही करत असते. तिवारी घरेलू क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व करतो. इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्स, कोलकाता नाइट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राइझिंग पुणे सुपरगियंट्सकडून खेळला आहे. त्याचबरोबर त्याने क्रिकेट कारकिर्दीत भारतीय संघाकडून 12 एकदिवसीय सामने आणि 3 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मनोज तिवारीने एकदिवसीय सामन्यात 26.09 च्या सरासरीने 287 धावा केल्या असून त्याच्या नावावर 1 शतकही आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अद्भुत झेल टिपल्याने चर्चेत आलेली हरलीन मुलांसोबत खेळायची क्रिकेट, वाचा तिच्याबद्दल
‘ईमानदारी आणि मुर्खपणात फरक असतो’; धोनीसंगे आयपीएलमधून निवृत्ती घेतो म्हणणाऱ्या रैनावर भडकले चाहते
सलग दुसऱ्या वनडेत अव्वल फलंदाज आझम सपशेल फ्लॉप, लहाण्या चाहत्याची प्रतिक्रिया व्हायरल