---Advertisement---

‘ईमानदारी आणि मुर्खपणात फरक असतो’; धोनीसंगे आयपीएलमधून निवृत्ती घेतो म्हणणाऱ्या रैनावर भडकले चाहते

On: रविवार, जुलै 11, 2021 11:52 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि माजी दिग्गज अष्टपैलू सुरेश रैना हे दोन्ही खेळाडू खूपच जवळचे मित्र आहेत. त्याचबरोबर या दोन्ही खेळाडूनी सोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सध्या हे दोन्ही खेळाडू इंडियन प्रीमियर लीगमध्ये एकाच संघातून खेळताना दिसून येतात.

आयपीएलमध्ये रैना आणि धोनी एकाच संघाकडून म्हणजेच चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतात. या जोडीला शोलेची ‘जय-वीरू’ असेही संबोधले जाते. मात्र रैना सध्या आपल्या एका विधानामुळे चर्चेत आला आहे. आपल्या आणि धोनीच्या आयपीएलमधील भविष्याबाबत त्याने मोठे विधान केले आहे.

धोनीसह रैनाही घेणार आयपीएलमधून निवृत्ती
रैनाने एका खासगी न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले की, त्याचे आयपीएलमधील भविष्य तोपर्यंत आहे जोपर्यंत धोनी खेळत आहे. धोनीबरोबरच त्याचा आयपीएलचा प्रवासही संपेल. रैना म्हणाला की, “अजून मी 4 ते 5 वर्षे क्रिकेट खेळू शकतो. पुढील वर्षी दोन नवीन संघ या लीगमध्ये मेगा लिलावात सामील होतील. मात्र जोपर्यंत मी आयपीएल खेळत आहे तोपर्यंत मी फक्त चेन्नईकडूनच खेळत राहिल.”

त्याचबरोबर रैना पुढे म्हणाला की, “जर धोनी भाई पुढच्या हंगामात निवृत्ती घेणार असतील; तर मी देखील आयपीएलमधूनही निवृत्ती घेणार आहे. 2008 पासून आम्ही दोघेही चेन्नईत एकत्र खेळत आहोत. जर आम्ही या हंगामात चांगली कामगिरी केली तर पुढच्या मोसमात मी धोनीला समजावण्याचा प्रयत्न करेल आणि कर्णधार त्याच्याशी सहमत देखील होईल. पण जर धोनी पुढचा हंगाम खेळण्यास नकार देत असेल तर मीही आयपीएलमधून बाहेर पडणार आहे.”

https://twitter.com/icetheticstarxx/status/1413506268107472903?s=20

https://twitter.com/R3Mitul/status/1413500843433685000?s=20

https://twitter.com/kumar_insane/status/1413504305529716737?s=20

रैनाच्या निर्णयावर चाहते भडकले
सुरेश रैनाने धोनीपाठोपाठ आयपीएलमधून निवृत्ती घेत असल्याचे सांगितल्याने चाहते खूप संतापले आहेत. काही चाहत्यांनी रैनाला असे घाईचे पाऊल न उचलण्याचा टाळण्याचा सल्ला दिला आहे. तर एका चाहत्याने रागाने रैनाला सांगितले की, ईमानदारी आणि मूर्खपणा यात खूप फरक असतो.

महत्त्वाच्या बातम्या-

सलग दुसऱ्या वनडेत अव्वल फलंदाज आझम सपशेल फ्लॉप, लहाण्या चाहत्याची प्रतिक्रिया व्हायरल

‘या’ क्रिकेटरवर जीवघेणा हल्ला, चाहते बनून आरोपी घुसले होते घरात; दोघांना अटक

फर्स्ट क्लास! ब्रावोने एका हाताने ठोकला कडक सिक्स, गोलंदाजाने नवलाने तोंडात घातली बोटे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---