भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेने 10 डिसेंबरपासून होणार आहे. तसेच, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिकाही खेळली जाणार आहे. अशात या तिन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. यातील कसोटी संघातून अनेक दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अशात याबद्दल भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्रा याने प्रकाश टाकला आहे.
कुणाचा पत्ता कट?
दक्षिण आफ्रिका (India Tour of South Africa) दौऱ्यासाठी भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवलेल्या खेळाडूंमध्ये दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Ajinka Rahane) यांच्या नावाचाही समावेश आहे. रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातील आपल्या दोन डावात 135 धावा केल्या होत्या. मात्र, वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत तो फ्लॉप ठरला होता. तसेच, पुजारा डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातील दोन्ही डावात खास प्रदर्शन करू शकला नव्हता. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध त्याची निवडही झाली नव्हती.
काय म्हणाला चोप्रा?
आपल्या युट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडिओत, आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने सांगितले की, वेस्ट इंडिजविरुद्ध 2 कसोटी सामन्यात उपकर्णधारपद भूषवल्यानंतर रहाणेला संघातून बाहेर केले आहे. त्याने म्हटले, “कसोटी क्रिकेटमध्ये मोठे बदल झाले आहेत. कहाणी बदलली आहे. कारण, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा दोघेही नाहीयेत. अज्जू उपकर्णधार होता, पण आता संघाचा भागही नाहीये. गोष्टी वेगाने बदलत आहेत.”
भारताचा माजी सलामी फलंदाजाने दक्षिण आफ्रिका कसोटीसाठी संभावित 5 खेळाडूंची निवड केली. त्याने म्हटले की, “रोहित शर्मा कर्णधार आहे. शुबमन गिल सलामी फलंदाज नाहीये. तो तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्यामुळे गिल तिसऱ्या क्रमांकावर येईल आणि यशस्वी सलामीला खेळेल. विराट कोहली चौथ्या क्रमांकावर येईल. तुम्ही पाहाल की, पाचव्या क्रमांकावर श्रेयस अय्यर किंवा केएल राहुल आहेत.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, जर भारतीय संघ व्यवस्थापनाने श्रेयस अय्यरला पाचव्या क्रमांकावर खेळवले, तर त्याला इशान किशन आणि केएल राहुल यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल. तो म्हणाला, “फक्त 2 यष्टीरक्षक आहेत. इशान किशन आणि केएल राहुल. त्यासाठी त्यापैकी कोणताही एक यष्टीरक्षकाच्या रूपात खेळू शकतो. त्यामुळे जर श्रेयस पाचव्या स्थानी खेळला, तर तुम्ही त्यांच्यापैकी एकाला यष्टीरक्षकाच्या रूपात खेळताना पाहू शकता.”
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार व शार्दुल ठाकूर. (former cricketer on ajinkya rahane absence from indias squad for south africa tests)
हेही वाचा-
‘…तर मी कसोटी खेळू शकणार नाही’, Team Indiaच्या स्टार खेळाडूचे धक्कादायक विधान
‘आता जेलमध्ये राहिलेल्या, मॅच फिक्स केलेल्या माणसाला सिलेक्शन कमिटीत घेणार’, माजी क्रिकेटरचे खडेबोल