Parthiv Patel Tweet: सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत भिडण्यासाठी सज्ज झाला आहे. 26 डिसेंबरपासून उभय संघातील पहिल्या कसोटीला सुरुवात होत आहे. तब्बल 31 वर्षांपासून भारतीय संघ यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोणतीही कसोटी मालिका जिंकू शकला नाहीये. अशात कर्णधार रोहित शर्मा हा दुष्काळ संपवत इतिहास घडवण्याचा प्रयत्न करेल. यावेळी भारताचा खेळाडू पहिल्यांदाच कसोटीत यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळताना दिसेल.
राहुल करणार कसोटी यष्टीरक्षणात पदार्पण
विशेष म्हणजे, इशान किशन आणि रिषभ पंत हे दोन्ही खेळाडू अनुपस्थित असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत केएल राहुल (KL Rahul) याला यष्टीरक्षक म्हणून सामील केले गेले आहे. त्यामुळे आता केएल राहुल यष्टीरक्षण (KL Rahul Wicket Keeping) करताना दिसेल. हे त्याचे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत यष्टीरक्षणातील पदार्पण असेल. याव्यतिरिक्त केएस भरत यालादेखील भारतीय संघात जागा दिली आहे, पण त्याला एक फलंदाजाच्या रूपात जास्त महत्त्व दिले आहे.
राहुलच्या यष्टीरक्षणावर माजी खेळाडूची प्रतिक्रिया
अशातच केएल राहुल याच्या यष्टीरक्षकाच्या रूपात संघात सामील होण्याविषयी अनेक माजी खेळाडूंनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामध्ये भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल (Parthiv Patel) यानेही राहुलविषयी सोशल मीडियावर एक खास रिऍक्शन दिली आहे. चला तर, तो काय म्हणालाय जाणून घेऊयात…
पार्थिव पटेल ट्वीट
पार्थिवने एक्स (पूर्वीचे ट्विटर) या हँडलवरून पोस्ट करत लिहिले की, “भारताच्या कसोटी सामन्यात एक असा यष्टीरक्षक पाहिजे, जो रणजी ट्रॉफी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सातत्याने यष्टीरक्षण करत आहे.” पटेलचे हे ट्वीट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताच, एका चाहत्याने त्याचा जुना फोटो शेअर करत त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला.
https://twitter.com/parthiv9/status/1738916274615550389?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1738916274615550389%7Ctwgr%5Ea5c875cabecc2486ec84650a12be0869aef916ab%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.jagran.com%2Fcricket%2Fheadlines-parthiv-patel-reaction-went-viral-after-kl-rahul-selected-for-wicketkeeper-in-test-series-against-south-africa-23613262.html
चाहत्याचे ट्वीट
चाहत्याने पोस्ट करत लिहिले की, “अच्छा तुमच्यासारखा नियमित कीपर असेल तर? ज्याने 2018मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर अनेक महत्त्वाचे झेल सोडले होते.” चाहत्याच्या या प्रश्नावर उत्तर देत पटेलने म्हटले की, “तेव्हा तो खेळाडू ड्रॉप होतो.” आता पार्थिव पटेलचे हे ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
https://twitter.com/parthiv9/status/1738958080870961208?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1738958080870961208%7Ctwgr%5Ea5c875cabecc2486ec84650a12be0869aef916ab%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.jagran.com%2Fcricket%2Fheadlines-parthiv-patel-reaction-went-viral-after-kl-rahul-selected-for-wicketkeeper-in-test-series-against-south-africa-23613262.html
अशात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटीत केएल राहुल यष्टीरक्षणाची जबाबदारी कशाप्रकारे पार पाडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (former cricketer parthiv patel reaction went viral after kl rahul selected for wicketkeeper in test series against south africa)
हेही वाचा-
Rohit Sharma Press Conference: पत्रकाराला जबरदस्त उत्तर देत म्हणाला, ‘कळतंय तुम्हाला काय म्हणायचं, लवकरच…’
‘मला त्याच्याविषयी खात्री नाही, त्याने मला खोटं ठरवावं…’, गावसकरांचे भारताच्या प्रमुख गोलंदाजाविषयी भाष्य