मागील काही दिवसांपासून पाकिस्तान क्रिकेटमध्ये बरीच उलथापालथ झाली. संघाला नवीन कर्णधारांपासून ते नवीन प्रशिक्षकांपर्यंत अनेक बदल झाले. मुख्य निवडकर्ता वहाब रियाज याच्या सल्लागार सदस्याच्या रूपात सलमान बट याची निवडही झाली. अशात पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे माजी अध्यक्ष रमीज राजा यांनी या निवडीबद्दल पीसीबीवर टीकास्त्र सोडले आहे. रमीज यांनी याव्यतिरिक्त कामरान अकमल याच्या नियुक्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, जो या त्रिकुटाचा भाग आहे. या समितीतील राव इफ्तिखार अंजुम हा तिसरा सदस्य आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शुक्रवारी (दि. 1 डिसेंबर) निवेदन जारी करत सलमान बट, कामरान अकमल आणि राव इफ्तिखार यांच्या नियुक्तीची पुष्टी केली. तसेच, ते म्हणाले की, यांनी तत्काळ प्रभावाने निवड समितीमधील आपली जबाबदारी सांभाळली आहे.
या मुद्द्यावर रमीज राजा (Ramiz Raja) यांनी म्हटले की, “एका अशा निवड समितीचे असणे वेडेपणा आहे, ज्यात एक असा सदस्य सामील आहे, ज्याच्या निर्णयाचे वर्णन प्रेमळ स्नेह असे केले जाऊ शकतात. तसेच, दुसरा असा की, जो मॅच फिक्सिंग प्रकरणी तुरुंगात बंद होता.”
माजी पीसीबी अध्यक्ष राजा यांनी मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सिंग प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या किंवा सट्टेबाजांच्या जवळच्या संपर्कात असल्याचे आढळलेल्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंविरुद्ध आवाज उठवला आहे. रमीज राजांनी माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याच्यावर 5 वर्षांची बंदी पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्याच्या पीसीबीच्या निर्णयावरही टीका केली होती.
खरं तर, मोहम्मद आमिर, मोहम्मद आसिफ आणि सलमान बट हे तिन्ही खेळाडू 2010मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सामील होते. बट, त्यावेळी पाकिस्तान कसोटी संघाचा कर्णधार होता. त्याच्यावर आयसीसीने 10 वर्षांची बंदी घातली होती.
बटने पाकिस्तानसाठी 33 कसोटी सामने, 78 वनडे आणि 33 टी20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 1889, वनडेत 2725 आणि टी20त 595 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एकूण 11 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. (former cricketer ramiz raza lashes out at pcb over tainted salman butt appointment it is insane)
हेही वाचा-
IPL 2024 लिलावात कोणत्या भारतीय क्रिकेटपटूंची बेस प्राईज 2 कोटी रुपये? केदारपासून ‘ही’ आहेत नावं
अय्यर संघात असतानाही ऋतुराज गायकवाडला केले उपकर्णधार, BCCI ट्रोल