वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा संपली आहे. अशात अनेक संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळल्या जात आहे आहेत. तसेच, काही संघ या मालिका खेळण्यासाठी परदेशाचा दौराही करत आहेत. यामध्ये पाकिस्तान संघाचाही समावेश आहे. पाकिस्तान संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने पाकिस्तान संघाच्या गोलंदाजी आक्रमणाची खिल्ली उडवली आहे. रिकी पाँटिंग याने पाकिस्तानच्या गोलंदाजी आक्रमणाला खूपच कमजोर म्हटले आहे.
पाकिस्तान संघ 30 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होईल. पाकिस्तान संघ डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सराव सामने खेळेल. त्यानंतर 14 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान कसोटी (Australia vs Pakistan Test Series) मालिकेला सुरुवात होईल.
रिकी पाँटिंगचे विधान
या कसोटी मालिकेपूर्वी रिकी पाँटिंगने पाकिस्तानी गोलंदाजांची खिल्ली उडवत म्हटले की, “जेव्हा मागच्या वेळी पाकिस्तान संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता, तेव्हा मी माध्यमांना म्हणालो होतो की, आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचा दौरा करणाऱ्या पाकिस्तान संघांमध्ये हे सर्वात कमजोर गोलंदाजी आक्रमण होते. आज मला वाटत आहे की, मी चुकीचा होतो. यावेळी जे पाकिस्तानी गोलंदाजी आमच्याकडे येत आहेत, ते मागील वेळीपेक्षाही खराब आहेत.”
Ricky Ponting to Fox News : "When last time Pakistan Team toured Australia, I told the press that they were the worst bowling side ever to tour Australia, today I feel I was wrong, the current set of Pak bowlers travelling this time are worse than the last time" #RickyPonting pic.twitter.com/iSB7n79Han
— Absolute fake Daniel Alexander (@mrcool0283) November 23, 2023
शाहीन आफ्रिदीशिवाय कुणीच नाही दमदार
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानच्या कसोटी संघात सर्वात महत्त्वाचा गोलंदाज शाहीन आफ्रिदी आहे. त्याच्यानंतर या संघात हसन अली आणि मोहम्मद वसीम यांचाही नंबर आहे. संभावता कसोटी सामन्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये याच वेगवान गोलंदाजी त्रिकुटासोबत पाकिस्तान मैदानावर उतरेल. इथे शाहीनने स्वत:ला सिद्ध केले आहे, पण वसीमला कसोटीचा जास्त अनुभव नाहीये. हसन अलीही चांगल्या फॉर्ममध्ये दिसत नाहीये. याव्यतिरिक्त पाकिस्तानच्या गोलंदाजी आक्रमणात कुठलेच प्रभाव पाडणारे नाव नाहीये.
संघात तज्ज्ञ फिरकीपटूंची कमतरता
याव्यतिरिक्त फिरकीपटूंच्या बाबतीत पाकिस्तान संघाची स्थिती आणखीच खराब आहे. पाकिस्तानमध्ये एकही तज्ज्ञ आणि विश्वासू फिरकीपटू नाहीये. विश्वचषक 2023 स्पर्धेतही तज्ज्ञ फिरकीपटूंच्या कमतरतेमुळे पाकिस्तानला उपांत्य सामन्यातून बाहेर करण्यात मोलाचा वाटा उचलला होता. अशात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाकिस्तान संघाचे गोलंदाज चांगली कामगिरी करतील की, पुन्हा फलंदाजांना जास्त धावा देतील, हे आमने-सामने आल्यावरच कळेल. (former cricketer ricky ponting on pakistan bowling attcak pak vs aus test series)
हेही वाचा-
WPL 2024: लिलावाची तारीख ठरली, ‘या’ दिवशी खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस
भारतीय कर्णधाराविषयी मुरलीधरनचा मोठा दावा! म्हणाला, ‘रोहित शर्मा पुढचा विश्वचषक…’