---Advertisement---

WTC Final : टीम इंडियासाठी ‘हा’ पठ्ठ्या ठरू शकतो ‘एक्स फॅक्टर’, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितलं नाव

On: गुरूवार, जून 1, 2023 5:15 PM
Shubman-Gill-And-Rohit-Sharma-And-Ishan-Kishan
---Advertisement---

नुकताच आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या स्पर्धेला चेन्नई सुपर किंग्स संघाच्या रूपात विजेता मिळाला. चेन्नईने गुजरात टायटन्स संघाला 5 विकेट्सने पराभूत करून पाचव्यांदा ट्रॉफी पटकावली. अंतिम सामन्यापूर्वी गुजरातने मुंबई इंडियन्स संघाचा क्वालिफायर 2 सामन्यात सामना केला होता. या सामन्यात गुजरातने मुंबईचा दारुण पराभव केला. पराभव झाला असला, तरीही मुंबईचा युवा फलंदाज ईशान किशन याचे नशीब चमकले आहे. त्याला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना 7 ते 11 जूनदरम्यान खेळला जाणार आहे. यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने किशनचे तोंडभरून कौतुक केले आहे.

डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना इंग्लंडच्या के ओव्हल मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघ आमने-सामने असतील. या सामन्यासाठी घोषित झालेल्या भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ईशान किशन (Ishan Kishan) आणि केएस भरत (KS Bharat) यांना स्थान मिळाले आहे. अशात या दोघांपैकी कोणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली पाहिजे, याबाबत चर्चा रंगल्या असतानाच रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने केलेले भाष्य सर्वांचे लक्ष वेधत आहे.

ईशान किशन ठरू शकतो संघाचा एक्स फॅक्टर
केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याचा बदली खेळाडू म्हणून ईशान किशन याला संघात घेतले. महत्त्वाचं म्हणजे, त्याला भारताकडून एकही कसोटी सामना खेळण्याचा अनुभव नाहीये. मात्र, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील त्याची आकडेवारी चांगली आहे. अशात पाँटिंगला त्याच्याकडून खूप आशा आहेत. त्याच्या मते, ईशान भारतासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो.

काय म्हणाला पाँटिंग?
आयसीसीशी बोलताना पाँटिंग म्हणाला की, “मी ईशान किशनला निवडेल. जर तुम्हाला वर्ल्ड चॅम्पियन बनायचे असेल, तर तुम्हाला सामना जिंकावा लागेल. सहावा दिवस (राखीव दिवस) यासाठीच जोडला गेला आहे, ज्यामुळे दोन्ही संघांना सर्वात चांगल्या निकालाची संधी देता येईल.”

पुढे बोलताना तो म्हणाला की, “मी सामन्यात ईशान किशनसोबत गेलो असतो. मला वाटते की, ईशान काही एक्स फॅक्टर देतो, ज्यामुळे तुम्हाला कसोटी सामना जिंकण्यात मदत होईल. निश्चितच जर रिषभ पंत फिट असता, तर तो खेळत असता आणि भारतासाठी एक्स फॅक्टर ठरला असता, पण तो नाहीये. ईशान यष्टीरक्षण चांगले करेल, पण तो तुम्हाला मोठी धावसंख्येचा रन रेट देऊ शकतो, जे कसोटी सामना जिंकण्याच्या प्रयत्नात पुढे जाण्यासाठी महत्त्वाचे असू शकते.”

किशनची प्रथम श्रेणी कारकीर्द
झारखंडकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या किशनने जुलै, 2014 मध्ये आसामकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 48 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत. त्यात त्याने 38.76च्या सरासरीने आणि 68.90च्या स्ट्राईक रेटने 2985 धावा केल्या आहेत. यादरम्यान 273 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या असून त्याच्या नावावर 6 शतके आणि 13 अर्धशतकांची नोंद आहे. (former cricketer ricky ponting picks ishan kishan to be team india x factor in ind vs aus wtc final 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! यशस्वीरीत्या पार पडली धोनीच्या गुडघ्याची सर्जरी, जाणून घ्या कुठे आणि कुणी केले ऑपरेशन
IPL संपताच गुजरातचा हुकमी एक्का दुखापतग्रस्त, महत्त्वाच्या मालिकेतून बाहेर पडल्याने राष्ट्रीय संघाला धक्का

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---