आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे आयोजित केलेल्या स्पर्धेत भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बऱ्याचदा अंतिम सामन्यांमध्ये प्रवेश मिळविला होता. परंतु अजून त्यांना एकही आयसीसीचा किताब जिंकला आला नाही. साल 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने अखेरचे आयसीसीचे विजेतेपद जिंकले होते. तर 2011 मध्ये भारताने शेवटचा विश्वचषक जिंकला होता. आता येत्या दोन वर्षांत दोन टी20 विश्वचषक आणि एक एकदिवसीय विश्वचषक आयोजित करण्यात येणार आहे. याच दरम्यान भारताचे माजी यष्टिरक्षक सबा करीमने पुढील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला कसा विजय मिळवता येईल? याबद्दल सल्ला दिला आहे.
पुढील तीन विश्वचषकात भारतीय संघाला जिंकण्याची सुवर्णसंधी भारताकडे असल्याचे सबा करीमचे म्हणणे आहे. सन 2020 आणि 2021 मध्ये टी20 विश्वचषक युएई आणि ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तर 2023 मध्ये होणारा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित केले जाणार आहे.
सबा करीम इंडिया न्यूजशी बोलताना म्हणाला की, “जर विराट कोहलीच्या संघाने पुढील टी20 विश्वचषकामध्ये विजयाची नोंद केली तर भारतीय संघाचा आत्मविश्वास येत्या अनेक स्पर्धांमध्ये खूप वाढलेला असेल. विराट कोहली आणि भारतीय संघाला पुढील तीन विश्वचषक खेळायचे आहेत आणि ही कोहली आणि भारतीय संघासाठी सुवर्णसंधी आहे.
सबा करीम पुढे म्हणाला की, “भारतीय संघाने जर यावर्षीचा टी20 विश्वचषकाचा किताब जिंकला; तर त्यांचा आत्मविश्वास अधिकाधिक वाढेल. त्यानंतर उर्वरित दोन विश्वचषक किताब देखील भारतीय संघाला जिंकण्यासाठी सोपे जाईल. माझे असे मत आहे की भारताजवळ उत्कृष्ट असा संघ आहे. खेळाडूंमध्ये खेळाप्रती उत्कटता आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यात बरेच क्रिकेटप्रेमी आहेत. फक्त आपल्याला हे पहावे लागेल की, आपण बनविलेल्या योजनांना योग्य रीतीने अमलात आणायचे पाहिजे. भारतीय संघाचा संतुलन खूपच चांगला आहे आणि त्यांनी आपली योजना योग्यप्रकारे आखली तर भारतीय संघाला यश नक्कीच मिळेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
दिलीप कुमार यांनी बीसीसीआयकडे केली होती ‘या’ खेळाडूची शिफारस, पुढे त्याने भारताला बनवले विश्वविजेता
मोकळे आकाश, हातात हात आणि धबधब्याखाली ईशांतचा पत्नीसंगे रोमान्स; पाहा व्हिडिओ
‘दादा’ला गोलंदाजी करणारा क्रिकेटर पोटासाठी करतोय मरमर, रस्त्यावर दाळपूरी विकण्याची आली वेळ