तब्बल 140 कोटी भारतीयांव्यतिरिक्त संपूर्ण जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष विश्वचषक 2023पूर्वी होत असलेल्या आशिया चषक 2023 स्पर्धेकडे लागले आहे. या स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. 6 देशात खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन श्रीलंका आणि पाकिस्तान अशा दोन देशात होणार आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ या स्पर्धेचा किताब जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. अशात भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आशिया चषक 2023साठी भारतीय संघ निवडला आहे.
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासाठी पाकिस्तान संघाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्याची प्लेइंग इलेव्हन निवडणे सोपे नसेल. मात्र, माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेसाठी भारताला किताब जिंकून देऊ शकेल असा आपला 11 सदस्यीय भारतीय संघ निवडला आहे.
‘दादा’ने निवडली भारतीय प्लेइंग इलेव्हन
‘दादा’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या गांगुलीने स्टार स्पोर्ट्सच्या शोमध्ये आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारताची सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. त्याने आपल्या संघात सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांची निवड केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर त्याने विराट कोहली याच्यावर विश्वास ठेवला आहे. तसेच, चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरला निवडले आहे. पाचव्या स्थानी गांगुलीने रवींद्र जडेजाला ठेवले आहे, तर यष्टीरक्षक म्हणून केएल राहुलवर विश्वास टाकला आहे.
सूर्या-ईशानची हाकालपट्टी
गांगुलीने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांना सामील केले नाहीये. सूर्याची वनडे क्रिकेटमधील कामगिरी खास राहिली नाहीये. हे स्वत: सूर्यानेही मान्य केले आहे. मात्र, ईशानने वेस्ट इंडिज दौऱ्यावर सलग 3 वनडे सामन्यात अर्धशतक झळकावले होते.
फॉर्ममधील गोलंदाजाला ‘दादा’ने केले बाहेर
अष्टपैलू खेळाडू म्हणून गांगुलीने हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेलला सामील केले आहे. मात्र, शार्दुल ठाकूर याला दादाच्या संघात स्थान मिळवता आले नाही. विशेष म्हणजे, गांगुलीने त्याच्या संघात फॉर्ममध्ये असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला ठेवले नाहीये. सिराजचे प्रदर्शन खूपच शानदार राहिले आहे. गांगुलीने वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्या हातात सोपवली आहे. तसेच, फिरकीपटू म्हणून त्याने कुलदीप यादव आणि अक्षरला संघात घेतले आहे.
अशात सौरव गांगुलीने निवडलेल्या संघाची क्रिकेटजगतात चर्चा रंगली आहे. (former cricketer sourav ganguly picks his team india playing 11 for asia cup 2023 ind vs pak dada lefts out this batsman)
हेही वाचलंच पाहिजे-
Asia Cup 2023: बलाढ्य संघांविरुद्ध भिडण्यासाठी नेपाळची धुरा 20 वर्षांच्या कर्णधारावर, वाचा कोण आहे तो
Asia Cup 2023ची A To Z माहिती एकाच क्लिकवर, स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी लगेच घ्या जाणून
Asia Cup 2023पूर्वी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोलमडला श्रीलंका संघ, चार धुरंधर स्पर्धेतून बाहेर; वाचा यादी