---Advertisement---

‘या’ खेळाडूला ‘दादा’चा फुल सपोर्ट; म्हणाला, ‘निवडकर्त्यांनी त्याला निवडून योग्यच केले…’

Sourav-Ganguly
---Advertisement---

भारत विरुद्ध पाकिस्तान संघात 2 सप्टेंबर रोजी आशिया चषक 2023 स्पर्धेतील महामुकाबला होणार आहे. या सामन्यासाठी चाहत्यांसोबतच क्रिकेटपटूही खूपच उत्साही आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. तसेच, संघात 3 फिरकीपटूंना संधी मिळाली आहे. याविषयी आता भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने मोठे विधान केले आहे. चला तर, गांगुली काय म्हणालाय, पाहूयात…

माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने प्रतिष्ठित वृत्तसंस्थेशी बोलताना आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेतील भारत-पाकिस्तान (India-Pakistan) सामन्याविषयी भाष्य केले. तो म्हणाला की, “भारत आणि पाकिस्तान दोन्ही चांगले क्रिकेट संघ आहेत. दोन्ही संघांपैकी जो कोणी चांगला खेळेल, तो संघ सामना जिंकेल. माझा आवडता कुणीही नाहीये.” याव्यतिरिक्त गांगुलीने जसप्रीत बुमराह याच्याविषयीही भाष्य केले. तो म्हणाला की, “वेळेसोबतच त्याच्या फिटनेसमध्ये सुधारणा होत जाईल. आयर्लंडमध्ये त्याने चांगली सुरुवात केली आहे. आता त्याला टी20तून वनडेत 10 षटके टाकावी लागतील.”

संघात 3 फिरकीपटूंचा समावेश
आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी निवडकर्त्यांनी भारतीय संघात 3 फिरकीपटूंना संधी दिली आहे. यामध्ये रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल (Azar Patel) यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच, आर अश्विन आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. गांगुली म्हणाला की, “अक्षर पटेलला निवडून त्यांनी योग्य काम केले आहे. तो फलंदाजीही करू शकतो.”

सन 2014मध्ये केले होते पदार्पण
अक्षर पटेलविषयी बोलायचं झालं, तर त्याने 2014मध्ये बांगलादेशविरुद्ध पदार्पण केले होते. त्याने भारतीय संघाकडून आतापर्यंत 52 वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 58 विकेट्स घेतल्या आहेत. तो गोलंदाजीत फायदेशीर ठरतो. भारतीय खेळपट्टीवर त्याच्याविरुद्ध खेळणे फलंदाजांसाठी खूपच कठीण असते. याव्यतिरिक्त त्याच्या बॅटमधून 413 धावांचा पाऊस पडला आहे. तो खालच्या फळीत विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. (former cricketer sourav ganguly said selectors done the right thing by picking axar patel asia cup 2023)

हेही वाचा-
बॉलिवूड अभिनेत्रीचा जलवा! थेट फ्रान्समध्ये केले World Cup 2023 ट्रॉफीचे अनावरण, बनली पहिलीच भारतीय कलाकार
पाकिस्तानविरुद्ध 151 धावांचा पाऊस पाडत अफगाणी पठ्ठ्याने रचला विक्रम, ‘एवढ्या’ कमी डावात ठोकली 5 शतके

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---