Sunil Gavaskar Criticizes: रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला सेंच्युरियन कसोटी सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघाने भारताला एक डाव आणि 32 धावांनी नमवले. भारताचा पराभव होताच माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी मोठे विधान केले. गावसकर म्हणाले की, भारतीय संघ या सामन्यात कोणत्याही तयारीशिवाय आला होता. चला त्याविषयी जाणून घेऊयात…
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्यानुसार, भारतीय संघाने सराव सामना खेळला नाही. तसेच, इंट्रा स्क्वॉड सामना खेळला. मात्र, यामुळे तुमची तयारी चांगली होत नाही. इंट्रा स्क्वॉड सामना एक चेष्टा आहे, ज्यामुळे तुमचं काहीही भलं होतं नाही.
काय म्हणाले गावसकर?
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावसकरांना भारतीय संघाच्या पराभवामागील प्रमुख कारण विचारले. याविषयी बोलताना गावसकर म्हणाले की, “याचे स्पष्ट कारण आहे की, तुम्ही इथे कोणताही सराव सामना खेळला नाही. जर तुम्ही थेट कसोटी सामना खेळण्यासाठी जाल, तर हेच हाल होतील. होय, तुम्ही भारतीय अ संघाला नक्कीच पाठवले होते आणि तो संघ दौऱ्यापूर्वी आला होता, पण इथे आल्यानंतर तुम्हाला सराव सामना खेळण्याची गरज असते.”
पुढे बोलताना गावसकर म्हणाले, “इंट्रा स्क्वॉड ही एक चेष्टा आहे. कारण, तुमचे वेगवान गोलंदाज आपल्याच फलंदाजांना वेगवान गोलंदाजी करणार का? ते या भीतीने वेगवान चेंडू टाकणार नाहीत की, त्यांचे फलंदाज दुखापतग्रस्त होणार नाहीत. त्यामुळे दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध सामना खेळला होता. वर्कलोडबद्दल तर बोललंच नाही पाहिजे.”
भारताचा पराभव?
सेंच्युरियन कसोटी (Centurion Test) सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय संघाला तीन दिवसातच एक डाव आणि 32 धावांनी पराभूत होण्यास भाग पाडले. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 163 धावांची आघाडी घेतली होती. मात्र, आव्हानाचा पाठलाग करताना भारताने दुसऱ्या डावात 34.1 षटकात 131 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. यामुळे अखेरच्या सत्रात भारताने 7 विकेट्स गमावत फक्त 69 धावा जोडल्या. अशाप्रकारे भारताला वाईटरीत्या पराभवाचा सामना करावा लागला. (former cricketer sunil gavaskar criticizes india for not playing practice games before 1st test vs south africa)
हेही वाचा-
AUS vs PAK: दुसऱ्या कसोटीत कांगारूंकडून पाकिस्तानची 79 धावांनी धुळधाण, मालिकाही घातली खिशात; कमिन्स ठरला हिरो
शमीची रिप्लेसमेंट मिळाली रे! दुसऱ्या कसोटीसाठी खुंखार गोलंदाज टीम इंडियात सामील, आफ्रिकेसाठी धोक्याची घंटा