येत्या 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये टी20 विश्वचषक स्पर्धेचा घाट घातला जाणार आहे. मात्र, यापूर्वीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी फळीतील महत्त्वाचा गोलंदाज या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तो गोलंदाज म्हणजेच जसप्रीत बुमराह होय. सोमवारी (दि. 3 ऑक्टोबर) बीसीसीआयने याची पुष्टी केली की, तो आता या स्पर्धेसाठी संघाचा भाग नाहीये. सध्या संघात असलेल्या गोलंदाजांना अखेरच्या षटकात गोलंदाजी करताना संघर्ष करावा लागतोय. अशात बुमराहबद्दल भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
मोहम्मद शमी याला संघात सामील करण्याची शक्यता
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला ठीक होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. बीसीसीआय सचिव जय शाह यांनीही म्हटले की, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने स्पष्ट केले आहे की, बुमराह आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) खेळू शकणार नाही. अद्याप बीसीसीआयने टी20 विश्वचषकासाठी बुमराहच्या जागी इतर कोणत्याही खेळाडूची निवड केली नाहीये.
असा अंदाज बांधला जात आहे की, मोहम्मद शमी किंवा दीपक चाहर यांची या विश्वचषकासाठी संघात निवड केली जाऊ शकते. मात्र, शमी आणि चाहर हे विश्वचषकासाठीच्या भारतीय राखीव खेळाडूंच्या यादीत सामील आहेत.
‘बुमराहसारखा कोणीच नाही’
भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही यावर आपले मत मांडले. त्यांनी आगामी टी20 विश्वचषकात जसप्रीत बुमराह याच्या न खेळण्यावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी मिड-डेसाठी लिहिलेल्या आपल्या कॉलममध्ये म्हटले की, “टी20 विश्वचषकासाठी जसप्रीत बुमराहची अनुपस्थितीत भारतीय संघासाठी मोठा झटका आहे. भारतीय संघात बुमराहसारखा कोणताच खेळाडू नाहीये.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन्ही टी20 सामने खेळले आणि आपण पाहिले की, तो किती प्रतिभावान आहे.”
या खेळाडूंवर दाखवला विश्वास
गावसकर पुढे म्हणाले की, “ज्याप्रकारे दीपक चाहर आणि युवा अर्शदीप सिंग यांनी तिरुवनंतपुरममध्ये परिस्थितीचा फायदा उचलला, त्यामुळे थोडी का होईना आशा जिवंत झाली आहे. कदाचित हे दोन्ही गोलंदाज बुमराहची कमतरता जाणवू देणार नाहीत.”
सध्या बुमराह बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे उपचार घेत आहे. आता बुमराहच्या जागी बीसीसीआय कोणत्या खेळाडूची निवड करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषकातून बाहेर गेलेला बुमराह अशी देणार टीम इंडियाला साथ, करणार ‘हे’ काम
नादच खुळा! टी20 विश्वचषकात जगभरातल्या 15 पंचांसोबत एकमेव भारतीय अंपायर करणार ‘पंचगिरी’