---Advertisement---

‘मी आधी धोनीसाठी खेळलो, त्यानंतर देशासाठी…’, निवृत्तीच्या 2 वर्षांनंतर रैनाच्या मनातलं आलं ओठांवर

Suresh-Raina-And-MS-Dhoni
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याने 15 ऑगस्ट, 2020 रोजी क्रिकेट जगताला जोरदार धक्का दिला होता. भारताला 3 आयसीसी ट्रॉफी जिंकून देणाऱ्या धोनीने यादिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. धोनीच्या घोषणेनंतर काही तासांतच भारतीय चाहत्यांना आणखी एक झटका बसला होता. कारण, मधल्या फळीतील यशस्वी भारतीय फलंदाज सुरेश रैना यानेही क्रिकेटला रामराम ठोकला होता.

वयाच्या 33व्या वर्षी निवृत्तीची घोषणा करण्याचा सुरेश रैना (Suresh Raina) याचा हा निर्णय अनेक चाहत्यांच्या गळ्याखाली उतरला नाही. आता दोन वर्षानंतर रैनाने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला निरोप देण्याच्या निर्णयावर मोकळेपणाने चर्चा केली आहे.

काय म्हणाला रैना?
माध्यमांशी बोलताना रैनाला धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर लगेच निवृत्ती घेण्याबाबत विचारण्यात आले. यावर तो म्हणाला की, “आम्ही एकसोबत भरपूर सामने खेळले आहेत. मी त्याच्यासोबत भारत आणि सीएसकेसाठी सामने खेळल्यामुळे भाग्यवान होतो. आम्हाला भरपूर प्रेम मिळाले.”

पुढे बोलताना रैना म्हणाला की, “मी गाझियाबादहून आलो आहे, तर धोनी रांचीतून. मी आधी एमएस धोनीसाठी खेळलो, त्यानंतर देशासाठी खेळलो. ते कनेक्शन आहे. आम्ही इतके अंतिम सामने खेळलो आहे, आम्ही विश्वचषक जिंकला आहे. तो एक महान कर्णधार आणि एक महान व्यक्ती आहे.”

https://twitter.com/ImRaina/status/1544752338992340995

रैनाची कारकीर्द
रैनाने 2011मध्ये भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. मधल्या फळीतील फलंदाज रैनाने 13 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत 18 कसोटी, 226 वनडे आणि 78 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये कसोटीत त्याने 768 धावा, वनडेत 5615 धावा आणि टी20त 1604 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एकूण 7 आंतरराष्ट्रीय शतके आहेत.

त्याच्या आयपीएलमधील सहभागाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 2021मध्ये आयपीएलचा शेवटचा हंगाम खेळला होता. त्याने 2022मध्ये आयपीएलच्या मेगा लिलावात नावदेखील दिले होते. मात्र, 2 कोटी मूळ किंमत असणाऱ्या रैनावर कुणीही बोली लावली नव्हती. विशेष म्हणजे, त्याला ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखले जाते. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 205 सामन्यात 5528 धावांचा समावेश आहे. यादरम्यान त्याने 1 शतक आणि 39 अर्धशतकेही झळकावली आहेत. (Former Cricketer Suresh Raina On MS Dhoni Read Here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एक-दोन नाही, सहा ठोकलेत! इफ्तिखारने वहाब रियाजच्या एकाच ओव्हरमध्ये भिरकावले 6 षटकार, व्हिडिओ व्हायरल
ऑस्ट्रेलियाची ताकद संपली? पहिल्या कसोटीपूर्वीच वेगवान गोलंदाजीचा कणा समजला जाणारा धुरंधर बाहेर, वाचाच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---