भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली विश्वचषक 2023 स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे. विराटच्या बॅटमधून धावांचा पाऊस निघत आहे. तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. असे असूनही काही क्रिकेटप्रेमी त्याला स्वार्थी म्हणत आहेत. विराटला असे बोलले जात असल्यामुळे काही दिग्गज क्रिकेटपटू नाराज आहेत. या यादीत वेंकटेश प्रसाद यांचाही समावेश आहे. माजी क्रिकेटपटूने सोशल मीडियाच्या माध्यमातून विराटविषयी आपलं मत मांडलं आहे.
काय म्हणाला माजी खेळाडू?
भारताचा 54 वर्षीय माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) याने विराट कोहली (Virat Kohli) याच्याविषयी मोठे विधान केले. त्याने एक्स (ट्वीट) करत लिहिले की, “विराटचे स्वार्थी होणे आणि वैयक्तिक विक्रमांचे वेड असल्याबाबत मजेशीर गोष्टी ऐकत आहे. होय, कोहली स्वार्थी आहे. देशाच्या एक अब्ज लोकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वार्थी होणे गरजेचे आहे.”
त्याने पुढे लिहिले की, “तो इतका स्वार्थी आहे की, त्याला काही मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले आहेत. तसेच, नवीन विक्रम प्रस्थापित करावे लागले आहेत. त्याने देशासाठी अनेक सामन्यात शानदार प्रदर्शन केले आहे आणि संघाचा विजय निश्चित केला आहे. होय, विराट कोहली स्वार्थी आहे.”
https://twitter.com/venkateshprasad/status/1721370783799562247?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1721370783799562247%7Ctwgr%5Ee56e8501c0ee076072a36e5693e9a9353e71cdf8%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news24online.com%2Fsports%2Fcricket%2Fvenkatesh-prasad-virat-kohli-selfish-odi-world-cup-2023%2F426361%2F
विराट का झाला ट्रोल?
खरं तर, विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत विराट शतकाच्या जवळ जाऊन संथ गतीने फलंदाजी करताना दिसला आहे. एवढंच नाही, तर यादरम्यान त्याने अधिकाधिक स्ट्राईक आपल्याकडेच ठेवली आहे. त्यामुळे काही माजी क्रिकेटपटू आणि चाहते त्याला स्वार्थी म्हणत आहेत. मात्र, हे सत्य नाहीये.
रोहित शर्मा याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार पडलेल्या सामन्यानंतर स्वत: मोठे विधान केले होते. तो म्हणाला होता की, “संघ परिस्थितीनुसार आपल्या रणनीतीत बदल करत आहे. त्यामुळेच वेगवान सुरुवात केल्यानंतर खेळपट्टी संथ होते, तेव्हा विराट अखेरच्या षटकात संथ गतीने फलंदाजी करताना दिसतो. त्याव्यतिरिक्त विराटला स्वत: जास्त फलंदाजी करायची नाहीये, तर त्याच्यासोबतचे खेळाडू विराटला धावा बनवण्याची भरपूर संधी देत आहेत.”
विराटचा पराक्रम
कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर रविवारी (दि. 05 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फलंदाजी करताना विराट कोहली याची बॅट तळपली. त्याने यादरम्यान 121 चेंडूंचा सामना करताना नाबाद 101 धावांची शतकी खेळी केली. या खेळीत 10 चौकारांचा समावेश होता. विराटने हे शतक ठोकताच त्याने सचिन तेंडुलकर याच्या वनडेतील 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. (former cricketer venkatesh prasad virat kohli selfish odi world cup 2023)
हेही वाचा-
विराटच्या 79 शतकांचं सेलिब्रेशन पाहा एका मिनिटात । VIDEO
‘भारत विरुद्ध आख्खं जग…’, दक्षिण आफ्रिकेच्या नांग्या ठेचल्यानंतर पाकिस्तानातून आली मोठी प्रतिक्रिया