भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना कोणाला पाहायला आवडत नाही? अर्थातच सर्वांनाच आवडतो. क्रिकेटप्रेमी या सामन्यासाठी स्टेडिअममध्ये तुडुंब गर्दी करतात. सामन्यादरम्यान अनेकदा दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये बाचाबाची होताना पाहायला मिळते. अशातच भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला त्याच्या एका जुन्या वक्तव्यावर सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या दोन्ही खेळाडूंमध्ये यांच्यात नेहमीच मैदानावर बाचाबाची पाहायला मिळायची.
वीरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तर (Virender Sehwag And Shoaib Akhtar) दोघेही क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. तरीही दोघे एकमेकांविषयी काही ना काही भाष्य करत असतात. विशेष म्हणजे, दोघांमध्या चांगली मैत्रीदेखील आहे. काही दिवसांपूर्वी ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अख्तरने सेहवाग याच्या केसांविषयी भाष्य केले होते. आता सेहवागनेही अख्तरच्या या वक्तव्यावर सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. सेहवागने एका युट्यूब चॅनेलशी बोलताना मोठे भाष्य केले. सेहवागला शोदरम्यान विचारले होते की, तुमच्यात आणि अख्तरमध्ये होणाऱ्या बाचाबाचीमध्ये काही मैत्रीही आहे का?
या प्रश्नाचं उत्तर देताना सेहवाग म्हणाला की, “जिथे प्रेम असते, तिथे मजा-मस्तीही असते. शोएब अख्तर याच्याशी 2003-04मध्ये चांगली मैत्री झाली होती. आम्ही तिथे दोन वेळा गेलो आणि ते दोन वेळा इथे आले. आमची मैत्री आहे, आम्ही एकमेकांची खिल्ली उडवतो. एका वक्तव्यात त्याने म्हटले होते की, सेहवागच्या डोक्यावर जेवढे केस आहेत, त्यापेक्षा जास्त नोटा माझ्याकडे आहेत. आता माझे केस तुझ्या नोटांपेक्षाही जास्त आहेत.”
भारतीय संघासाठी सेहवागचे प्रदर्शन
वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने तिन्ही क्रिकेट प्रकारात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 104 कसोटी, 251 वनडे आणि 19 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 49.34च्या सरासरीने 8586 धावा केल्या आहेत. तसेच, वनडेत त्याने 35.05च्या सरासरीने 8273 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये त्याने 145.38च्या स्ट्राईक रेटने 394 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एकूण 38 शतकांचा समावेश आहे. (former cricketer virender sehwag s reply to shoaib akhtar said this take a look)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शेन वॉर्नच्या ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ला 30 वर्षे पूर्ण, आख्ख्या जगाला भुवया उंचावण्यास पाडलेले भाग
‘सर्वजण सचिनबद्दल बोलतात, पण आशियात तोच सर्वोत्तम…’, सेहवागने गायले पाकिस्तानी खेळाडूचे गोडवे