Wasim Jaffer On Impact Player Rule: भारताचा माजी खेळाडू आणि पंजाब किंग्स संघाचा फलंदाजी प्रशिक्षक वसीम जाफर याने आपल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. जाफरच्या मते, इंडियन प्रीमिअर लीगने इम्पॅक्ट प्लेअर नियम रद्द करण्याची गरज आहे. मात्र, जाफरने असे ट्वीट का केले आहे, हे जाणून घेऊयात…
आयपीएल 2023मधील नियम
भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू वसीम जाफर (Wasim Jaffer) याने म्हटले आहे की, भारतीय क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त अष्टपैलू खेळाडू तयार होण्यासाठी आयपीएलने (IPL) इम्पॅक्ट प्लेअर नियम (Impact Player Rule) रद्द केला पाहिजे. खरं तर, इम्पॅक्ट प्लेअर नियमांतर्गत सामन्यादरम्यान दोन्ही संघ प्रत्येकी 1 सब्स्टिट्यूट खेळाडूला मैदानावर उतरवू शकतात. हा निमय आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात लागू केला गेला होता.
वसीम जाफरचे ट्वीट
वसीम जाफर याने ट्वीट करत लिहिले की, “मला वाटते की, आयपीएलने इम्पॅक्ट प्लेअर नियम रद्द करण्याची गरज आहे. कारण, हा नियम अष्टपैलू खेळाडूंना जास्त गोलंदाजी करण्यासाठी प्रोत्साहित करत नाहीये. तसेच, अष्टपैलूंची कमतरता आहे आणि फलंदाज गोलंदाजी करत नाहीयेत, जी भारतीय क्रिकेट संघासाठी चिंतेची बाब आहे.”
I think IPL needs to take away the impact player rule, as it's not encouraging the all rounders to bowl much and lack of ARs and batters not bowling is a major area of concern for Indian cricket. Thoughts? #IPL2024 #iplauction2024
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) December 10, 2023
काय आहे इम्पॅक्ट प्लेअर नियम?
इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा वापर करण्यासाठी टॉसदरम्यान कर्णधाराला प्लेइंग इलेव्हनसह 5 अशा खेळाडूंची नावे द्यायची असतात, ज्यांना ते सामन्यादरम्यान वापरू इच्छितात. संघ यापैकी कोणत्याही एका खेळाडू सब्स्टिट्यूट म्हणून संधी देऊ शकतो. या नियमांतर्गत आता 11 खेळाडूंच्या जागी 12 खेळाडू खेळू शकतात. 12व्या खेळाडूला इम्पॅक्ट प्लेअर म्हटले जाते.
हा नियम अंमलात आल्यापासून संघांनी अष्टपैलू खेळाडूंना जास्त महत्त्व दिला नाहीये. तसेच, अधिकतर संघ 6 फलंदाज आणि 5 गोलंदाजांसोबत खेळतात. जाफरची चिंता रास्त आहे. कारण, भारतीय संघ मागील काही काळापासून अष्टपैलू खेळाडूंसाठी संघर्ष करत आहे. भारताला हार्दिक पंड्यासारखा कोणताही अष्टपैलू मिळाला नाहीये आणि त्याची उणीव विश्वचषक 2023 स्पर्धेदरम्यान भासली. आगामी लिलावातही संघ कदाचितच अष्टपैलू खेळाडूंवर लक्ष देतील. मात्र, लीगमध्ये अष्टपैलू खेळाडूंनी अनेकदा मोठी रक्कम मिळवली आहे. आयपीएल 2023 लिलावात सॅम करण (18.5 कोटी) आणि कॅमरून ग्रीन (17.5 कोटी) या अष्टपैलूंवर संघांनी मोठी बोली लावली होती. (former cricketer wasim jaffer wants ipl to take away the impact player rule know why)
हेही वाचा-
Shocking: धोकादायक खेळपट्टीमुळे BBL 2023मधील सामना रद्द, नेमकं काय घडलं?
INDvsSA: पहिल्या टी20त कोण करणार Opening? कॅप्टन सूर्या म्हणाला, ‘निर्णय तर कधीच झालाय…’