fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कोरोनाविरुद्धच्या लढाईत माजी महान क्रिकेटर दान करणार आपल्या मौल्यवान वस्तु

आपल्या सर्वांना माहिती आहे की, जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अशामध्ये क्रीडा जगतातून अनेक दिग्गजांनी पैशांच्या रुपात मदत केलेली आपण पाहिले आहे. परंतु आता या व्हायरसविरुद्धच्या लढाईत काही खेळाडूंनी आपल्या मौल्यवान वस्तूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

जलतरणपटू मायकेल फेल्प्सने (Michael Phelps) कोविड-१९ (Covid-19) विरुद्धच्या लढाईत पैशांची जमवाजमव करण्यासाठी त्याने आपल्या आठवणीतील मौल्यवान वस्तूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. फेल्प्स त्याची स्वाक्षरी असलेल्या स्वतःच्या स्वीमसुटचा लिलाव करणार आहे.

फेल्प्सबरोबरच या व्हायरसविरुद्धच्या लढाईत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम (Wasim Akram) आणि इंग्लंडचा माजी गोलंदाज डॅरेन गॉफ (Darren Gough) हे खेळाडूही सामील झाले आहेत.

अॅथलीट रिलीफ डॉट ओआरजीच्या अहवालानुसार अक्रम आणि डॅरेन गाॅफयांनी आपल्या मौल्यवान वस्तूंचा लिलाव करण्याचे आश्वासन दिले आहे. या सर्व वस्तूंचा ‘सेंटर फॉर डिझास्टर फिलँथ्रॉफी’मार्फत कोविड-१९ साठी लिलाव केला जाईल.

पाकिस्तानसाठी कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या अक्रमने स्वाक्षरी केलेली आपली बॅट आणि चेंडूचा लिलाव करण्याचे आश्वासन दिले आहे. इंग्लंडसाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज डॅरेन गाॅफने स्वाक्षरी केलेला आपला चेंडूचा लिलाव करण्याचे आश्वासन दिले आहे.

अक्रमने कसोटीत १०४ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २३.६२ च्या सरासरीने सर्वाधिक ४१४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने ३५६ वनडे सामन्यात २३.५२ च्या सरासरीने ५०२ विकेट्स घेतल्या आहेत.

डॅरेन गाॅफने १५९ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २६.४२ च्या सरासरीने २३५ विकेट्स घेतल्या आहेत.

याचबरोबर अमेरिकेतील एनएफएलचा माजी स्टार फुटबॉलपटू रॉब रॉब ग्राँकोस्की (Rob Gronkowski) स्वाक्षरी केलेल्या फुटबॉलचा लिलाव करण्याचे देण्याचे आश्वासन दिले आहे.

या खेळाडूंव्यतिरिक्त या मोहिमेमध्ये माईक टायसन, निक फॅल्डो, रॉरी मॅक्लरी, मार्टिना हिंगीस, स्टीफन करी यांचा समावेश आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १- पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर

-रिटायरमेंटची गोष्ट बोलताच धोनीला आला राग

You might also like