भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग हा नेहमीच त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी चर्चेत राहिला. याव्यतिरिक्त तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. त्याचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांकडून पसंत केले जातात. मात्र, आता याच युवराजबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. युवराज एका मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्याने गोवा येथे असे काहीतरी केले आहे, ज्यामुळे राज्य सरकारकडून युवराज सिंगला नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच, त्याला सुनावणीसाठीही बोलावणं धाडलं आहे.
अडचणीत सापडला युवराज सिंग
युवराज सिंग (Yuvraj Singh) याला गोवा पर्यटन विभागाने (Goa Tourism Department) नोटीस बजावली आहे. ही नोटीस त्याला मोरजिममधील व्हिला नोंदणी न करता ‘होमस्टे’ म्हणून चालवल्यामुळे पाठवण्यात आली आहे. या नोटीसमध्ये त्याला 8 डिसेंबर रोजी सुनावणीसाठी बोलावले आहे. गोवा पर्यटन व्यापार अधिनियम 1982च्या अंतर्गत राज्यात ‘होमस्टे’चे संचालन नोंदणी केल्यानंतरच केले जाऊ शकते.
युवराजला भरावा लागू शकतो दंड
राज्याच्या पर्यटन विभागाचे उपसंचालक राजेश काळे यांनी 18 नोव्हेंबर रोजी उत्तर गोव्यातील मोरजिम येथील युवराज सिंग याच्या मालकीच्या व्हिला ‘कासा सिंग’ या पत्त्यावर नोटीस बजावली. त्यात त्यांनी युवराजला 8 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता येथे वैयक्तिक सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले. नोटीशीत 40 वर्षीय युवराजला विचारण्यात आले की, पर्यटन व्यापार कायद्यांतर्गत मालमत्तेची नोंदणी न केल्याबद्दल त्याच्यावर दंडात्मक कारवाई (एक लाख रुपयांपर्यंत दंड) का सुरू करू नये.
नोटीशीत युवराजच्या ट्वीटचाही उल्लेख
युवराजला जारी करण्यात आलेल्या नोटीशीत म्हटले गेले आहे की, “वरचेवाडा, मोरजिम, पेरनेम, गोवा येथे असलेले तुमचे निवासी संकुल कथितपणे होमस्टे म्हणून कार्यरत आहे आणि ते ‘एअरबीएनबी’ सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बुकिंगसाठी उपलब्ध असल्याचे अधोस्वाक्षरीदाराच्या निदर्शनास आले आहे.”
I’ll be hosting an exclusive stay at my Goa home for a group of 6, only on @Airbnb. This is where I spend time with my loved ones & the home is filled with memories from my years on the pitch. Bookings open Sep 28, 1pm IST at https://t.co/5Zqi9eoMhc 🏖️#AirbnbPartner @Airbnb_in pic.twitter.com/C7Qo32ifuE
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) September 21, 2022
विभागाने युवराजच्या एका ट्वीटचाही उल्लेख केला आहे, ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, तो आपल्या गोव्यातील घरात सहा लोकांचा पाहुणचार करेल आणि याची बुकिंग फक्त ‘एअरबीएनबी’वर होईल. आता युवराजबद्दल या प्रकरणात पुढे काय घडते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (former cricketer yuvraj singh gets notice from goa government over commercial use of casa singh villa)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘दबाव नेहमीच असतो, पण मी मैदानावर कुठलेही…’, प्लेअर ऑफ द मॅच सूर्याची प्रतिक्रिया
‘मी घरी जातोय…’, भारताला टी20 मालिका जिंकून दिल्यानंतर कर्णधार पंड्याचे मोठे वक्तव्य