न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने 3 सामन्यांची टी20 मालिका 1-0ने खिशात घातली. मात्र, या मालिकेतील फक्त एकच सामना पावसाच्या व्यत्ययाशिवाय पार पडला. हा मालिकेतील दुसरा सामना होता. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तसेच, तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाचा पूर्ण डाव खेळला गेला, परंतु भारतीय संघ 9 षटकेच खेळू शकला. हा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार बरोबरीत सुटला. यासह भारताने मालिकाही नावावर केली. या सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला. यामध्ये पंड्या याने पावसाबद्दलही वक्तव्य केले.
काय म्हणाला हार्दिक पंड्या?
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) म्हणाला की, “आम्हाला पूर्ण षटके खेळून जिंकायचे होते. एकेवेळी मला वाटले की, या खेळपट्टीवर आक्रमण करणे हा सर्वात चांगला बचाव आहे. आम्हाला माहिती आहे की, त्यांच्याकडे कशाप्रकारचे गोलंदाजी आक्रमण आहे. आम्ही काही विकेट्स गमावल्या तरीही त्या 10-15 धावा करणे महत्त्वाचे आहे. अशाप्रकारच्या खेळाने आम्हाला काही खेळाडूंना पारखण्याची संधी मिळू शकते, परंतु असे म्हटले जाऊ शकते की, वातावरण अशी गोष्ट आहे, ज्यावर आम्ही नियंत्रण मिळवू शकत नाही. मी घरी जात आहे, माझा वेळ मी माझ्या मुलासोबत घालवेल.”
Done and dusted 🏆🤙 Way to go #TeamIndia 🇮🇳 pic.twitter.com/P2vkdawRJp
— hardik pandya (@hardikpandya7) November 22, 2022
न्यूझीलंड संघाचा डाव सर्वबाद 160 धावांवर संपुष्टात आला होता. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाच्या डावाच्या 9व्या षटकात पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे सामना त्यावेळी थांबवण्यात आला. यावेळी भारतीय संघाने 4 विकेट्स गमावत 75 धावा केल्या होत्या. मात्र, सामना पुन्हा सुरू झाला नाही. दोन्ही संघांच्या धावसंख्या डकवर्थ लुईस नियमानुसार बरोबर होत्या. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.
भारतीय संघाची गोलंदाजी
तिसऱ्या सामन्यातील भारताच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं, तर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने 4 षटके गोलंदाजी करताना 17 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच, अर्शदीप सिंग यानेही 4 षटके गोलंदाजी करताना 37 धावा देत 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच, हर्षल पटेल यानेही 1 विकेट घेत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. (nz vs ind skipper hardik pandya reaction after 3rd t20i went tied)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जुन्या निवड समिती बद्दल कार्तिकचे वक्तव्य; म्हणतोय,’त्यांनी खूप..’
‘आता पंतला हाकलण्याची वेळ आलीये’, रिषभच्या फ्लॉप प्रदर्शनानंतर चाहत्यांच्या तिखट प्रतिक्रिया