Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ना पत्नी नताशा ना मुलगा अगस्त्य; हार्दिकच्या यशाचे सिक्रेट आहे ही खास व्यक्ती

November 22, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Hardik-Pandya

Photo Courtesy: Twitter/ICC


भारतीय क्रिकेट संघाचा भविष्यातील कर्णधार म्हणून सध्या हार्दिक पंड्याच्या नावाची चर्चा आहे. नुकत्याच न्यूझीलंडमध्ये झालेल्या टी20 मालिकेत त्याच्याच नेतृत्वात भारतीय संघाने विजय साकार केला. टी20 विश्वचषकात भारतीय संघाला अपयश आल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये हा बदल होत आहे. स्वतः हार्दिक देखील उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसतोय. त्याचवेळी हार्दिकच्या या यशाचे रहस्य काय आहे, याबाबत खुलासा झाला आहे.

टी20 विश्वचषकात हार्दिक जबरदस्त फॉर्ममध्ये दिसलेला. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात त्याने आपले बहुमूल्य योगदान दिलेले.‌ पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने विराट कोहलीसह सामना जिंकणारी भागीदारी करताना 40 धावा तसेच 3 बळी मिळवलेले. तर, उपांत्य सामन्यातही त्याने आपल्या बॅटची करामत दाखवत तुफानी अर्धशतक साजरे केले होते. त्याच्या या यशाचे रहस्य एक खास व्यक्ती असल्याचे नुकतेच समोर आले.

एका प्रमुख वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, हार्दिकने विश्वचषकादरम्यान आपल्या वैयक्तिक शेफला ऑस्ट्रेलियाला नेले होते. केवळ ऑस्ट्रेलियात नव्हे तर अनेकदा महत्त्वाच्या सामन्यांवेळी तो हार्दिकसोबत असतो. आरव नांगिया या नावाचा हा शेफ विश्वचषकावेळी भारतीय संघाच्या टीम हॉटेलपासून जवळच राहायचा. हार्दिकला आवश्यक ते पदार्थ तो बनवून देत. आरवने दिलेल्या माहितीनुसार,

‘हार्दिक सध्या भारताच्या सर्वात फिट क्रिकेटपटूंपैकी एक आहे. याचे कारण त्याने आपल्या आहारावर योग्य नियंत्रण ठेवलेय. तो दररोज 3000 कॅलरी घेतो. सामना असेल तेव्हा 4000 कॅलरी त्याला हव्या असतात. तूप टाकून केलेली मुगडाळ खिचडी हा त्याचा आवडता पदार्थ आहे.’

पुढील टी20 विश्वचषकाच्या दृष्टीने बीसीसीआय हार्दिककडे टी20 संघाचे नेतृत्व सोपावू शकते. पुढील श्रीलंका दौऱ्याआधी याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

(Hardik Pandya Travel With His Personal Chef In World Cup)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: इंग्लंडविरुद्ध दीडशतक झळकावणाऱ्या पठ्ठ्याने कच्चून मारला षटकार, वॉर्नरही पाहतच राहिला
पावसाची दादागिरी! सुपर ओव्हर न खेळवता भारत- न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना टाय


Next Post
Hardik-Pandya

'मी घरी जातोय...', भारताला टी20 मालिका जिंकून दिल्यानंतर कर्णधार पंड्याचे मोठे वक्तव्य

team-india-2

टीम इंडियाला धक्का! मॅचविनरच बांगलादेश दौऱ्यातून बाहेर; 'या' खेळाडूचा होऊ शकतो समावेश

Sanju-Samson

न्यूझीलंडविरुद्ध फ्लॉप ठरलेल्या पंतवर सॅमसन कधीही भारी, 'अशी' आहे दोघांची आयपीएल 2022 ची आकडेवारी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143