ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांमध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील शेवटचा सामना मंगळवारी (दि. 22 नोव्हेंबर) मेलबर्न येथे खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 221 धावांनी पराभव केला. या सामन्यात एक अशी घटना घडली, ज्यीमुळे सर्व प्रेक्षक पोटधरुन हसू लागले. ओली स्टोन याने स्मिथला मजेशीरपणे बाद केले. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय.
ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाजी सुरू होती आणि डावाचे 46वे षटक टाकले जाणार होते. यावेळी इंग्लंडचा ओली स्टोन (Olly Stone) गोलंदाजीसाठी आला. षटकाच्या तिसऱ्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर स्टीव स्मिथ (Steve Smith) याने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फटका मारण्याचा प्रयत्न हुकला आणि चेंडू त्याच्या ग्लोव्जला घासून सरळ जोस बटलर (Jos Buttler) याच्या हातात गेला. बटलरने योग्यरीत्या तो चेंडू पकडला. सुरुवातीला पंच पॉल विल्सन (Paul Wilson) यांनी स्मिथला बाद घोषीत केले नाही. त्यानंतर बटलरने रिव्हियू घेण्याचा इशारा केला. त्यानंतर पंचानी स्मित हास्य करत त्याला बाद घोषित केले. खरतर पंच विल्सन अपील केव्हा होते याची वाट पाहत होते आणि अपील केल्यानंतरच स्मिथला बाद घोषित केले.
ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर क्लिन स्वीप
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 48 षटकात 355 धावांचा डोंगर उभा केला. या डावात ट्रॅविस हेड याने 152 तर डेविड वॉर्नर याने 106 धावांची झंझावती शतके झळकावत ऑस्ट्रेलियाला हा धावांचा डोंगर उभा करण्यात मदत केली. डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडला 364 धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला इंग्लंड संघ 31.4 षटकात 142 धावांवरच गुंडाळला गेला.
या तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला क्लिन स्वीप (3-0) दिला. मालिकेतील ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात इंग्लंडला 6 गडी राखून पराभूत केलेले, तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 72 धावांनी विजय मिळवला होता.(Umpire delayed in giving decision of wicket which created humour in stadium)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘दबाव नेहमीच असतो, पण मी मैदानावर कुठलेही…’, प्लेअर ऑफ द मॅच सूर्याची प्रतिक्रिया
न्यूझीलंडविरुद्ध फ्लॉप ठरलेल्या पंतवर सॅमसन कधीही भारी, ‘अशी’ आहे दोघांची आयपीएल 2022 ची आकडेवारी






