वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिल्या सामन्यासाठी गुरुवारी (दि. 05 ऑक्टोबर) इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघ आमने-सामने आहेत. मात्र, स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी अनेक माजी खेळाडूंनी रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाला किताबाचा प्रबळ दावेदार सांगितले आहे. तसेच, काहींच्या मते, विश्वचषकाची ट्रॉफी इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया उंचावू शकते. मात्र, भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान याचे मत वेगळे आहे.
झहीर खानने कुणावर दाखवला विश्वास?
झहीर खान (Zaheer Khan) याने दक्षिण आफ्रिकेवर विश्वास दाखवला आहे. त्याच्या मते, टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वातील संघ खूपच संतुलित दिसत आहे. मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना झहीरने म्हटले की, “प्रत्येकजण विश्वचषकासाठी भारत, पाकिस्तान इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाला प्रबळ दावेदार मानत आहेत. मात्र, दक्षिण आफ्रिका संघ प्रत्येकाला हैराण करू शकतो.” झहीरच्या मते, दक्षिण आफ्रिका संघ खूपच संतुलित दिसत आहे. त्यामुळे ते या स्पर्धेत लांबचा प्रवास निश्चित करू शकतात.
ऑस्ट्रेलियाला चारलीय पराभवाची धूळ
विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वातील संघाने शानदार प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली होती. त्यांनी 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाला 3-2ने नमवले होते. या मालिकेच्या चौथ्या सामन्यात बावुमासेनेच्या फलंदाजांनी वादळी फलंदाजी करत 416 धावांचा डोंगर उभारला होता.
यावेळी संघाकडून हेन्रीच क्लासेन याने 83 चेंडूत 174 धावांची धमाकेदार खेळी साकारली होती. विशेष म्हणजे, पहिले दोन वनडे सामने गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने पुढील तिन्ही सामन्यांमध्ये जबरदस्त प्रदर्शन करत मालिका आपल्या खिशात घातली होती.
विश्वचषकातील दक्षिण आफ्रिकेचा सामना
वनडे विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा पहिला सामना 7 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे होणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेपुढे श्रीलंकेचे आव्हान असणार आहे. (former cricketer zaheer khan predicts that south africa will be dark horse in icc world cup 2023)
हेही वाचा-
CWC23: कर्णधारांच्या बैठकीत बावुमाला डुलकी! फोटो व्हायरल होताच म्हणाला, ‘मी झोपलो नव्हतो…’
अश्विनने 140 कोटी भारतीयांना सांगितली गंभीरची सत्यता; म्हणाला, ‘त्याने 2011च्या विश्वचषकात…’