विराट कोहली आणि रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता कोहली-रोहितची जागा टी20 मध्ये भारतीय संघात रिकामी आहे. अश्या परिस्थितीत या महान खेळाडूंची उणीव कोण भरुन काढणार असा प्रश्न निर्माम होत आहे. या प्रश्नावर भारताचा माजी क्रिकेटर दिनेश कार्तिकने प्रतिक्रिया दिली आहे. कार्तिकने आश्या 4 खेळाडूंचे नाव घेतले आहे जे टी20 मध्ये कोहली आणि रोहितची पोकळीक भरुन काढण्याची क्षमता त्यांच्यात आहे. क्रिजबझच्या शोमध्ये 4 संभाव्य खेळाडूंच्या नावांवर दिनेश कार्तिकने आपले मत मांडले आहे.
दिनेश कार्तिक म्हणाला, रोहित आणि विराटची जागा घेणे कोणत्याही खेळाडूसाठी खूप अवघड आहे. परंतु टीम इंडियामध्ये असे खेळाडू आहेत जे कोहली आणि रोहितची जागा नक्कीच भरुन काढू शकतात. माझ्या नजरेत ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, टिळक वर्मा आणि शुबमन गिल हे चार असे खेळाडू आहेत. जे येणाऱ्या काळात या महान खेळाडूंची जागा घेऊ शकतात.
खर तरं, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या रुपात आपल्या टी20 करिअरला विराम दिला. कार्तिकला वाटते की युवा खेळाडू त्याचा वारसा पुढे नेण्यास सक्षम आहेत आणि ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, टिळक वर्मा आणि शुबमन गिल हे असे खेळाडू आहेत जे टी20 इंटरनॅशनलमध्ये किंग कोहली आणि हिटमॅनची भरपाई करू शकतात.
वास्तविक, आगामी श्रीलंका दाैऱ्यासाठी 3 टी20 आणि तितकेच एकदिवसीय सामन्यांसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. आश्चर्यकारक म्हणजे या संघामध्ये ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्माला स्थान देण्यात आलेले नाही.
श्रीलंका दाैऱ्यासाठी भारतीय संघ याप्रमाणे-
भारतीय टी20 संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.
भारताचा एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रायन पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
महत्त्वाच्या बातम्या-
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे किती खेळाडू भाग घेत आहेत? कोणत्या राज्यातील खेळाडूंची संख्या सर्वाधिक?
सचिनला नाही, ‘या’ भारतीय फलंदाजाला गोलंदाजी करताना अख्तरला फुटायचा घाम
रोहितचं नाव होणार अजरामर, शतकांच्या विक्रमापासून केवळ दोन पावलं दूर ‘हिटमॅन’!