भारतीय संघ आगामी टी२० विश्वचषकासाठी संघात कोणते खेळाडू निवडावेत यासाठी निरनिराळे प्रयोग करत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक टी२० मालिका खेळणे आणि युवा खेळाडूंना संधी देणे यांचा समावेश आहे. त्यातच भारताने कोणत्या रणनीतीने या स्पर्धेत खेळावे याबद्दल इंग्लंडच्या माजी कर्णधाराने मोठे विधान केले आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या या टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने कोणत्या गोलंदाजाला घेऊन विश्वचषकात सामील व्हावे याबाबत इंग्लंडचे माजी कर्णधार डॅरेन गॉफ (Darren Gough) यांनी काहींची नावे सुचविली आहेत. त्यांनी युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला संघात घ्यावे, असे विधान केले आहे.
भारतीय संघात सध्या वेगवान गोलंदाज मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामध्ये जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar), मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर, प्रसिध कृष्णा, आवेश खान, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश आहे. निवडकर्त्यांकडे एवढे पर्याय उपलब्ध असताना कोणत्या खेळाडूला संघात जागा मिळणार हे पाहण्याजोगे ठरणार आहे.
उमरान बरोबरच डॅरेन यांनी सिराजलाही टी२० विश्वचषकात संघात निवड करण्याचे सुचविले आहे. त्यांनी एका युट्युब चॅनेलवर संवाद साधताना म्हटले, “बुमराह हा क्रिकेटच्या सर्व प्रकारातील सध्याचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. तर तो पहिली तुमची निवड असणार तर भुवनेश्वरकडे स्विंग करण्याची कला आहे. तो सुरूवातीला विकेट काढण्यात माहिर असल्याने तोही विश्वचषकाच्या संघात असणार आहे.”
“सिराजने ऑस्ट्रेलियामध्ये उत्तम गोलंदाजी केली आहे. त्यामुळे तो एक पर्याय आहे. त्यानंतर तुमच्याकडे उमरान आहे. त्याच्याकडे प्रचंड वेग असून तो ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टींवर फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरेल. भारताकडचे पर्याय पाहता सिराज, भुवनेश्वर, बुमराह आणि उमरान यांना खेळवणे अधिक फायद्याचे ठरणार आहे,” असेही डॅरेन यांनी पुढे म्हटले आहे.
उमरानने यंदाच्या वर्षीच आयर्लंड विरुद्ध टी२० क्रिकेटमध्ये राष्ट्रीय संघात पदार्पण केले आहे. त्याने ३ टी२० सामने खेळले असून त्यामध्ये २ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) २०२२च्या हंगामात सनरायजर्स हैद्राबादकडून खेळताना त्याने ताशी १५७ किमीच्या गतीने गोलंदाजी करत सगळ्यांना आश्चर्यचकित केले. क्रिकेट विश्वात अनेक खेळाडू त्याच्या वेगाचे चाहते झाले आहेत. त्यातच आता इंग्लंडच्या एका खेळाडूची भर पडली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
किती हे क्रिकेट? टी२० विश्वचषकाआधी टीम इंडिया खेळणार दोन नव्या मालिका; असा आहे कार्यक्रम
‘शार्दुल ठाकुरकडे हार्दिक पंड्याएवढी क्षमता नाहीये…’, माजी दिग्गजाची प्रतिक्रिया चर्चेत
कॅरेबियन भूमीवर कॅप्टन शिखरकडे धोनी-रोहितला मागे टाकण्याची संधी; हे विक्रम करेल स्वतःच्या नावे