आगामी टी२० विश्वचषक बीसीसीआयच्या आयोजनात १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वी अफागानिस्तानमध्ये तलिबानने कब्जा केला होता. यानंतर अफगानिस्तान क्रिकेट संघ टी२० विश्वचषकात सहभागी होईल, याबाबत संशय निर्माण झाला होता, पण त्यानंतर संघ विश्वचषकात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले. अशात टी२० विश्वचषकाला अवघे काही दिवस बाकी असताना अफगानिस्तान क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये एका माजी दिग्गजाचा समावेश झाला आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक एँडी फ्लॉवर यांची अफगानिस्तान संघाच्या मार्गदर्शकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
झिम्बाब्वेचे माजी दिग्गज कर्णधार ऍंडी फ्लॉवर आता अफगानिस्तान क्रिकेट संघाच्या बायो बबलमध्ये सहभागी झाले आहेत. फ्लॉवरची अफगानिस्तान क्रिकेट संघाच्या मार्गदर्शकाच्या रूपात नियुक्ती केली गेली आहे. अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. फ्लॉवरने यापूर्वी २००९ ते २०१४ या काळात इंंग्लंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. २०१० साली इंग्लंडच्या टी२० विश्वचषक विजयामध्ये फ्लॉवरने महत्वाची भूमिका पार पाडली होती.
The former Zimbabwe Captain Andy Flower has joined the Afghanistan cricket bubble ahead of starting his consultancy role with the team for the T20 World Cup 2021.
More: https://t.co/fUgtoMjd2U pic.twitter.com/lLB3I3LGVH
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 8, 2021
अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अजीजुल्लाह फाजलींनी याबाबत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आम्हाला आनंद आहोत की, ऍंडी आमच्यासोबत जोडले गेले आहेत. ऍंडीने आमच्या अनेक खेळाडूंसोबत विविध फ्रँचायझींसाठी स्पर्धेत काम केले आहे. त्यांचा व्यापक अनुभव विश्वचषकात संघाला मदत करण्यासाठी फायदेशीर ठरेल आणि उपयोगी ठरेल.”
आगामी टी२० विश्वचषकाचे आयोजन यापूर्वी भारतात केले जाणार होते, पण भारतातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय बदलला गेला. आता विश्वचषक यूएई आणि ओमानमध्ये खेळवला जाणार आहे. टी२० विश्वचषकातील पहिला सामना १७ ऑक्टोबरला खेळला जाणार असून शेवटचा सामना १४ नोव्हेंबरला खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रवी शास्त्रींनंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक कोण? ‘या’ नव्या परदेशी दिग्गजाचे नाव चर्चेत
इशान-सूर्यकुमारच्या फटकेबाजीपुढे पियुष चावलाचा ‘मोठा’ विक्रम राहिला दुर्लक्षित!
वा रे पठ्ठ्या! आयपीएल २०२१मध्ये संघाच्या एकूण धावांच्या ३३% धावा करणारा ‘तो’ ठरलाय एकमेव खेळाडू