फुटबॉल विश्वातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांची तब्येत खूपच नाजूक आहे. ते रुग्णालयात मृत्यूविरुद्ध लढा देत आहेत. त्यांना कर्करोग असून त्यावर उपचार सुरू आहेत. पेले यांनी त्यांचा ख्रिसमस हा सण रुग्णालयातच साजरा केला. त्यांची तब्येत पाहता जवळचे नातेवाईक रुग्णालयात गर्दी करत आहेत. पेले यांची तब्येत सातत्याने खालावत आहे, ज्याचा परिणाम त्यांच्या किडनी आणि हृदयावर होत आहे.
मित्र आणि कुटुंबीय रुग्णालयात होतायेत जमा
कर्करोगाशी लढा देत असलेले 82 वर्षीय पेले (Pele) यांना पाहण्यासाठी त्यांचे जवळचे आणि कुटुंबातील सदस्य रुग्णालयात हजेरी लावत आहेत. रविवारी (दि. 25 डिसेंबर) त्यांची मुलगी केली नैसिमेंटो हिने इंस्टाग्रामवर तिच्या कुटुंबाचा फोटो शेअर केला. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, “कृतज्ञता, प्रेम आणि कुटुंबाची साथ. हाच ख्रिसमसचा सार आहे. ख्रिसमसवर तुम्ही पाठवलेल्या इतक्या साऱ्या प्रेमासाठी धन्यवाद. आभार आणि प्रेम. या मजेशीर आणि अद्भुत आयुष्यात मी त्यांच्याविना काहीच नसते. आज आणि कायमचे. ख्रिसमसच्या शुभेच्छा.”
पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ब्राझीलला जिंकून दिले तीन विश्वचषक
खरं तर, पेले हे त्यांच्या दैनंदिन तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, हळूहळू त्यांची तब्येत बिघडू लागली. ते आतापर्यंत त्यातून बाहेर आले नाहीयेत. पेले यांना हृदयाशी संबंधित समस्या होत्या. पेले यांनी 1958, 1962 आणि 1970मध्ये ब्राझील संघाला विश्वचषक जिंकून दिला होता. नेमार याने नुकतेच फीफा विश्वचषक 2022 (Fifa World Cup 2022) दरम्यान ब्राझीलच्या पेले यांच्या 77 गोलच्या विक्रमाची बरोबरी केली होती.
https://www.instagram.com/p/Cmj26ufO-T7/?utm_source=ig_embed&ig_rid=1877e2ac-4a42-4e86-9714-3640f0fa3e94
ब्राझीलच्या खेळाडूंनी आणि चाहत्यांनी विश्वचषकादरम्यान पेले यांचा फोटो असलेले मोठे बॅनर फडकावले होते. पेले यांनी अर्जेंटिना संघाला शुभेच्छा दिल्या. तसेच, 2022च्या अंतिम सामन्यानंतर लिओनल मेस्सी आणि किलियन एम्बाप्पे यांच्या प्रदर्शनाची प्रशंसाही केली. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्स संघाला 4-2 ने पराभूत केले होते. तसेच, तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. (former footballer peles condition critical family and friends gather in hospital daughter shared emotional post)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पराभवानंतरही बांगलादेशी कर्णधार ऐटीतच! म्हणाला, ‘…तर सामन्याचा निकाल वेगळा असता’
सुनील गावसकरांवर कोसळला दुःखाचा डोंगर! जवळच्या व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास