भारतीय हॉकी क्षेत्रामध्ये मागील दोन वर्षांत काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. भारतीय हॉकीच्या महिला आणि पुरुष संघांच्या कामगिरीत कमालीचे सुधारणा झाली असून, टोकियो ऑलिम्पिकमध्ये याचा सर्वांना प्रत्यय आला. गेल्या काही वर्षांत वादाचे केंद्र असलेले भारतीय हॉकी संघ आणि हॉकी संघटना अलीकडच्या काळात वादांपासून दूर आहेत. मात्र, आता पुन्हा एकदा भारतीय हॉकी वादात सापडताना दिसत आहे.
भारतीय महिला आणि पुरुष संघाचे माजी प्रशिक्षक श्योड मरायना यांनी पुरुष संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आत भारताच्या पुरुष व महिला संघाने माजी प्रशिक्षकाविरुद्ध कायदेशीर कारवाईची तयारी सुरू केल्याचे वृत्त येत आहे.
गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघाने चौथ्या क्रमांकापर्यंत मजल मारत ऐतिहासिक कामगिरी केली होती. नेदरलँडचे माजी हॉकीपटू आणि प्रशिक्षक श्योड मरायना यांना या कामगिरीचे श्रेय दिले होते. आता मरायना यांचे विल पॉवर हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले असून, ज्यामध्ये त्यांनी आपले अनेक अनुभव सांगितले आहेत. भारतीय पुरूष हॉकी संघांसोबतच्या कार्यकाळाबद्दलही त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण खुलासा केले. यामध्ये त्याने दावा केला आहे की, 2018 मध्ये जेव्हा ते पुरुष संघाचे प्रशिक्षक होता, तेव्हा त्यांनी निवडलेल्या एका युवा खेळाडूला कर्णधार मनप्रीत सिंगने खराब खेळण्यास सांगितले होते. जेणेकरून त्याच्या जागी मनप्रीतच्या मित्राचा संघात समावेश केला जाईल.
माजी भारतीय प्रशिक्षकाच्या या आरोपामुळे भारतीय हॉकी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. हॉकी इंडियाने याबाबत अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी संयुक्त निवेदनाद्वारे मनप्रीतचे समर्थन केले आहे. तसेच, माजी प्रशिक्षकांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुस्तकाचा खप वाढावा म्हणून अशा प्रकारचा आरोप केला जात असल्याचे खेळाडूंनी म्हटले. याबाबत मरायना व संबंधित प्रकाशकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे सांगितले जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपआधीच रोहित आणि द्रविडला मिळाली वॉर्निंग! काय आहे संपूर्ण प्रकरण?
विराटच्या शिरपेचात मानाचा तुरा! टी20 इतिहासात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
गुजरात टायटन्सने शुबमन गिलला दिला नारळ? ट्विट करत लिहिले…