---Advertisement---

धोनीच्या काळात चमकलेली ‘कुलचा’ जोडी करणार ‘लंकादहन’, दिग्गजाकडून एकत्र खेळवण्याची मागणी

On: रविवार, जुलै 4, 2021 7:18 PM
Kuldeep Yadav, Yuvendra Chahal And MS Dhoni
---Advertisement---

भारतीय वरिष्ठ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून दुसरा भारतीय युवा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. या युवा संघाला श्रीलंका विरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका तर तीन टी20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. भारतीय संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली हे सामने खेळणार आहे. याचदरम्यान भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या दोन्ही गोलंदाजांच्या एकत्र खेळण्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाले की, श्रीलंका विरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेदरम्यान या दोन्ही गोलंदाजांना एकसोबत खेळविले पाहिजे. भारत आणि श्रीलंका मध्ये पहिला सामना 13 जुलैला होणार आहे. या भारतीय युवा संघामध्ये सहा फिरकीपटूंचा समावेश आहे, ज्यामध्ये कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलचा देखील समावेश आहे.

व्हीव्हीएस लक्ष्मण यांची कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलबद्दलची प्रतिक्रिया
स्टार स्पोर्ट्सवर बोलत असताना व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना एकत्र खेळण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाले की, “मला असे खरच वाटते आहे की या दोन्ही फिरकीपटूंनी तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळले पाहिजे. संघामध्ये एकूण सहा फिरकीपटू आहेत. श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रत्येक गोलंदाजाला 10 षटके गोलंदाजी करण्याची संधी मिळेल. जितकी जास्त हे गोलंदाज गोलंदाजी करतील इतकेच त्यांना यश देखील मिळेल. या गोलंदाजांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल, जे कुलदीप यादवसाठी देखील खूप गरजेचे आहे.”

व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या मतानुसार, कुलदीप यादवसाठी त्याचा आत्मविश्वास परत आणणे खूप महत्त्वाचे आहे. ते पुढे म्हणाले की, “आपल्या सर्वांना माहितीच आहे की युजवेंद्र चहल हा एक यशस्वी आणि अनुभवी गोलंदाज आहे. युजवेंद्र चहलचा आत्मविश्वास खूपच चांगला आहे आणि टी20 विश्वचषक पाहता भारतीय संघामध्ये त्याला महत्त्वाचे स्थान असेल. कुलदीप यादवला आपला आत्मविश्वास परत आणणे खूप गरजेचे आहे.” तु

म्हा सर्वांना माहितीच असेल की मागील काही दिवसांपासून कुलदीप यादव खराब कामगिरी करत आहे आणि हेच कारण आहे की भारतीय संघामध्ये त्याला नियमितपणे संधी मिळत नाही. जर व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या म्हणण्यानुसार, कर्णधार शिखर धवनने माजी कर्णधार एमएस धोनीच्या काळात चमकलेल्या या गोलंदाजी जोडीला एकत्र खेळवले. तर पुन्हा त्यांची चमकदार कामगिरी पाहायला मिळू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

आधीच संघाबाहेर असलेल्या विहारीची चिंता शिगेला, दिग्गजाने त्रिशतक करणाऱ्या ‘या’ फलंदाजाचा सुचवला पर्याय

लव्ह की अरेंज मॅरेज? चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर स्म्रीती मंधानाचे ‘स्मार्ट’ उत्तर

‘तो ५-६ वर्षांपुर्वीसारखा खेळाडू राहिला नाही,’ रहाणेच्या फ्लॉप कामगिरीवर माजी क्रिकेटर नाराज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---