भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी नेहमीच तुलना केली जाते. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावावर क्रिकेटचे अनेक मोठे विक्रम आहेत. अशात सचिनचे विक्रम मोडण्यासाठी विराट कोहली हा एकमेव खेळाडू दावेदार आहे, असे मानले जाते. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अंशुमान गायकवाड यांनी याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
अंशुमान गायकवाड (Anshuman Gaikwad) यांनी विराट कोहली (Virat Kohli) वर खूप विश्वास दाखवला आहे. ३३ वर्षीय विराट भविष्यात भारतासाठी २०० कसोटी सामना खेळू शकतो असे म्हटले आहे. यापूर्वी सचिन हा एकमेव खेळाडू आहे ज्याने २०० कसोटी सामने खेळले आहेत. गायकवाड यांना विश्वास आहे की, विराट हा विक्रम मोडू शकतो. एका वृत्तवाहिनीशी बोलताना गायकवाड म्हणाले की, “विराट १०० कसोटी सामने खेळला आहे आणि तो अजूनही खेळत आहे. विराटला १०० कसोटी सामने खेळल्यानंतर जो अनुभव मिळाला आहे, तो सर्वात मोठा आहे.”
गायकवाड यांच्या मते, “जोपर्यंत विराट फिट आहे, तोपर्यंत त्याची बरोबरी कोणीच करू शकणार नाही. तसेच तो स्वतःच्या फिटनेसविषयी खूप सतर्क आहे. फिटनेसच्या जोरावर जर त्याने भारतासाठी २०० कसोटी सामने खेळले, तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण, तो सतत खेळत आहे. पुढच्या ७-८ वर्षात तो २०० कसोटी सामन्यांच्या जवळ पोहोचेल. मला पूर्ण विश्वास आहे की, विराट फिट राहील आणि पुढचे १० वर्ष खेळेल. भारतीय संघासाठी हे खूप फायदेशीर ठरेल.”
दरम्यान, याव्यतिरिक्त सचिन तेंडुलकरच्या १०० शतकांचा विक्रम मोडण्यासाठी विराटला पहिल्यापासूनच प्रमुख दावेदार मानले गेले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने ४९ शतके केली आहेत. तर विराटच्या नावावर आतापर्यंत ४३ एकदिवसीय शतकांची नोंद झाली आहे. अशात विराट एकदिवसीय क्रिकेटमध्ये लवकरच सचिनची बरोबरी करू शकतो. असे असले तरी, मागच्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून विराट एकही शतक करू शकला नाहीय. विराटच्या ७१ व्या षटकाची प्रतिक्षा चाहते अनेक दिवसांपासून करत आहेत.
महत्वाच्या बातम्या –
अखेर विनू मंकड यांच्या मुलाला मिळाला न्याय! मंकडींग विरोधातील ‘त्या’ लढ्याला आले यश
तोडफोड मंडळाचा नवा मेंबर! टीम डेव्हिडचे मुंबई इंडियन्सकडून ‘ढिंच्याक’ स्वागत; पाहा व्हिडिओ
अखेर दोन वर्षांनी ‘महाराष्ट्र केसरी’ला मिळाला मुहूर्त! राजधानी सातारा भूषविणार यजमानपद