भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सध्या कसोटी क्रिकेटमधील नंबर 1 गोलंदाज आहे. आपल्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर त्याने जागतिक क्रिकेटवर छाप पाडली आहे. क्रिकेटच्या सध्याच्या युगात बुमराह हा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज असल्याचेही अनेक दिग्गजांंनी म्हटले आहे. आता बुमराहच्या शोधावर भारताचे माजी प्रशिक्षक जॉन राइट (John Wright) यांनी मोठा खुलासा केला. तो त्यांच्या नजरेत कसा आला हे त्यांनी सांगितले आहे.
जॉन राइटने (John Wright) 2013 मध्ये घरच्या मैदानावरील टी20 सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) पहिल्यांदा पाहिले होते. अहमदाबादमध्ये खेळल्या जात असलेल्या त्या सामन्यात बुमराह मुंबईविरूद्ध गुजरातकडून खेळत होता. त्याच्या एका मुलाखतीत जॉन राइट म्हणाला, “मी त्या (जसप्रीत बुमराह) मुलाला असामान्य गोलंदाजी करताना पाहिले. जो सर्व 12 चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करत होता. मला वाटले की, मी यापूर्वी असे काही पाहिले नव्हते. तो वेगवान होता.”
यानंतर जाॅन राइट यांनी गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलकडून (Parthiv Patel) माहिती घेतली. पार्थिव म्हणाला, तो बूम आहे. आम्ही लगेच त्याच्यावर सही केली. त्यावेळी तुम्हाला लिलावाची माहिती असण्याची गरज नव्हती. यानंतर सराव सत्रादरम्यान राइटने बुमराहला सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करण्यास सांगितले. सरावानंतर सचिनने राइटला विचारले की हे मूल कोण आहे? त्याला खेळणे कठीण आहे. त्या काळात राइटला वाटले, की तो यशस्वी झाला आहे.
पुढे बोलताना राइट यांनी म्हणाले, “चांगली सुरुवात असूनही, बुमराहला त्याच्या सुरुवातीच्या हंगामात अनेक अडचणींचा सामना करावा लागला, कारण त्याने 2013 मध्ये फक्त काही सामने खेळले होते. हे एका रात्रीत मिळालेले यश नव्हते. त्यानंतर 2014 मध्ये बुमराह मुंबईसाठी महत्त्वाचा गोलंदाज म्हणून उदयास आला.” बुमराहला शोधण्यात जॉन राइटसोबत मुंबई इंडियन्सनेही (Mumbai Indians) महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबईत खेळल्यानंतरच बुमराहचे भारतीय संघात खेळण्याचे दरवाजे खुले झाले होते.
जसप्रीत बुमराहच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 41 कसोटी, 89 वनडे आणि 70 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 41 कसोटी सामन्यात त्याने 20.06च्या सरासरीने 181 विकेट्स घेतल्या आहेत, तर 89 वनडे सामन्यात त्याने 23.55च्या सरासरीने 149 विकेट्स घेतल्या आहेत. टी20 मध्ये बुमराहने 70 सामन्यात 89 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS: आउट की नॉट आउट? थर्ड अंपायरच्या निर्णयावर मोठा गोंधळ; सोशल मीडियावर चाहत्यांचा आक्रोश
SFA चॅम्पियनशिप 2024 मुंबई; फुटबॉल फील्ड, टेनिस कोर्टवर सुवर्णपदकांची लढाई
ENG vs NZ; 3 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमधील हॅट्रिकचा दुष्काळ संपला, इंग्लंड गोलंदाजाने रचला इतिहास






