सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही मालिका खेळली जात आहे. ही मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे. दरम्यान दोन्ही संघातील तिसरा कसोटी सामना ड्राॅ राहिला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या सामन्यात खास कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी रोहितला सल्ला दिला आहे.
पर्थमध्ये 295 धावांनी विजय मिळवलेल्या ‘केएल राहुल’च्या (Rohit Sharma) सलामीवीर म्हणून चांगल्या कामगिरीनंतर ‘रोहित शर्मा’ने (Rohit Sharma) दुसऱ्या सामन्यापासून सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला यायला सुरूवात केली. पण फलंदाजीच्या क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर आल्यानंतर रोहितने सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत 10, 3 आणि 6 धावा केल्या आहेत.
रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले की, “मला वाटते की रोहितची मैदानात उतरून प्रतिपक्षावर हल्ला करण्याची आणि इतर कशाचीही चिंता न करण्याची मानसिकता स्पष्ट असणे आवश्यक आहे. तुम्हाला शेवटची गोष्ट हवी आहे ती म्हणजे बचाव करायचा की हल्ला करायचा हे दोन मनात असावे. त्याच्या बाबतीत, तो विरोधकांवर हल्ला करू शकतो. तो त्वरीत शाॅर्ट चेंडू उचलतो, त्याला या क्रमांकावर विरोधकांचा सामना करावा लागेल.”
पुढे बोलताना शास्त्री म्हणाले, “कारण जर तो पहिल्या 10-15 मिनिटांत बाहेर पडला, तर तो 15-20 मिनिटांच्या, अर्ध्या तासाच्या पुढे जाऊ शकत नाही. मग तुम्ही नैसर्गिक खेळ का करत नाही, विरोधकांवर हल्लाबोल करून मग पुढे का जात नाही? कारण मला वाटते की केवळ फॉर्ममध्ये येण्याचा नाही तर भारतासाठी सामने जिंकण्याचा हा त्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. कारण ती संख्या महत्त्वाची आहे. जगातील सर्वोत्तम क्रमांक 6 ते आहेत, ज्यांना प्रति-हल्ला कसा करायचा हे माहित आहे. त्यांना परिस्थिती चांगली समजते.”
महत्त्वाच्या बातम्या-
Year Ender 2024; यंदाच वर्ष ठरलं केकेआरसाठी खास, तिसऱ्यांदा कोरलं ट्रॉफीवर नाव!
शेवटच्या वेळी चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये कोणी मारली होती बाजी? भारत कितव्या स्थानी राहिला?
INDW vs WIW; हरमनप्रीत कौरने रचला इतिहास, शानदार खेळीने विश्वविक्रम मोडला