---Advertisement---

आयपीएलमध्ये रैनाला मिळाली नाही संधी, पण मालदीव सरकारने दिलाय मोठा पुरस्कार

On: रविवार, मार्च 20, 2022 3:16 PM
Suresh-Raina
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज सुरेश रैना याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता तो आयपीएमध्येही खेळतना दिसणार नाही. रैनाची क्रिकेट कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले आणि तो भारताचा एक दिग्गज खेळाडू आहे. त्याने भारतीय क्रिकेटसाटी दिलेल्या योगदानासाठी मालदीव सरकारने ‘स्पोर्ट्स आयकॉन’ हा मानाचा पुरस्कार रैनाला दिला आहे. रैनासहीत या वेळी १६ आंतरराष्ट्रीय खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.

मालदीव सरकारकडून दिल्या गेलेल्या या ‘स्पोर्ट्स आयकॉन’ पुरस्कारासाठी सुरेश रैना (Suresh Raina) पात्र ठरला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यात रैनासोबत रियल मद्रीदचे माजी खेळाडू रॉबटर कर्लोस, श्रीलंका संघाचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या, जमैकाचे असाफा पॉवेल आणि नेदरलंडचा दिग्गज फुटबॉलपटू एडगर डेविड्स यांच्यासह एकूण १६ खेळाडूंना सन्मानित केले गले.

रैनाने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत केलेल्या कामगिरीसाठी आणि विक्रमांसाठी बांगलादेशचे युवा खेळ मंत्र मोहम्मद जहीर अहसान रसेल, सऊदी अरबचे खेळ उप मंत्री अल कादीबद्र अब्दुल रहमान आणि मालदीव टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष अहमद नजीर यांच्या हस्ते पुरस्कार देला गेला.

कार्यक्रमाचे अध्यक्षपद मालदीपचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह, खेळ मंत्री, जगप्रसिद्ध एथलीट्स आणि मालदीवच्या एथलीट्सने भूषवले. मालदीवचे युवा खेळ आणि सामाजिक अधिकार मंत्री अहमद महलूफ यांनी स्वागताचे भाषण केले आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली.

महलूफने सांगितले की, त्यांना या पुरस्कार सोहळ्याला एक सुसंगत असा वार्षिक कार्यक्रम बनवायचे आहे. जेणेकरून वेगवेगळ्या खेळातील एथलीट्स योग्य प्रमाणात श्रेय, समर्थन आणि पाठिंबा देता येईल. साऊदी खेळांचा विकास आणि किंगडमचे विजन २०३० प्राप्त करण्याच्या दृष्टीने केले जाणारे प्रयत्न आणि प्रयोगांसाठी साऊदी अरबचे खेळ मंत्री प्रिंस अब्दुलअजीज बिन तुर्की अल-फैजल यांना इब्राहिम मोहम्मद यांनी पुरस्कार देऊन सन्मिनित केले. त्यांनी मालदीवमध्ये खेळांसाठी दिलेल्या त्यांच्या समर्थनासाठीही सन्मिनित केले गेले.

महत्वाच्या बातम्या –

इंग्लंडने चक्क ‘नंबर वन’ गोलंदाजाला महत्त्वाच्या मालिकेतून वगळले, मग गोलंदाजानेही व्यक्त केला ‘हा’ मानस

अन् ‘त्या’ चिमणीला लॉर्ड्स संग्रहालयात मिळाली जागा, वाचा काय आहे कहाणी

वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी विश्वचषक खेळणारा तमिम इक्बाल, ज्याने क्रिकेटविश्वात बांगलादेशला मिळवून दिले मानाचे स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---