भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जात आहे. त्यातील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान माजी भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) म्हणाले की, भारतीय क्रिकेट संघातील महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीमुळे निर्माण झालेली पोकळी लगेचच रिषभ पंतने (Rishabh Pant) भरून काढली. ज्याने ‘डक टू वॉटर’सारखे कसोटी क्रिकेट स्वीकारले.
डिसेंबर 2022 मध्ये कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिषभ पंत (Rishabh Pant), आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज पंतने 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गाबा येथे चौथ्या कसोटीत 89 धावांची मॅच-विनिंग इनिंग खेळली आणि मालिकेत 274 धावा केल्या. भारताच्या 2-1च्या विजयात त्याने मोलाची भूमिका बजावली.
राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “धोनी गेल्यानंतर तुम्हाला वाटले असेल की, त्याची जागा घेण्यास कदाचित वेळ लागेल. मी असे म्हणत नाही की त्याने त्याची जागा घेतली आहे, परंतु निश्चितपणे त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पंतने विलक्षण, अविश्वसनीय कामगिरी केली आहे.
पुढे बोलताना राहुल द्रविड म्हणाले की, “गाबा येथे तो कसोटी सामना जिंकण्यासाठी पंतने 89 धावा केल्या हे पाहा, जेव्हा सर्व काही धोक्यात आले होते आणि संघ इतका कमकुवत होता, त्या प्रकारच्या दबावाखाली, असा आत्मविश्वास. पंत एकदम हुशार, खास क्रिकेटर आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टँडला ‘या’ खेळाडूंची नावे असणार! केएल राहुल म्हणाला, “एक दिवस माझेही…
“क्रिकेटला उच्च स्तरावर नेण्याची क्षमता जय शाह…” माजी आयसीसी अध्यक्ष्यांचे मोठे वक्तव्य
दुसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूचे मोठे वक्तव्य! म्हणाला, “जसप्रीत बुमराह, विराट कोहली…”