भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. तर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. बुमराहनं टी20 विश्वचषकात आपल्या गोलंदाजीनं कहर केला आणि भारताला चॅम्पियन बनवण्यात मदत केली. भारताचा माजी खेळाडू रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना वाटत आहे की, वेगवान गोलंदाज बुमराहनं त्याच्या इच्छेनुसार चेंडूवर नियंत्रण ठेवण्याच्या क्षमतेनं गेल्या महिन्यात भारताला टी20 विश्वचषक जिंकून दिला. शास्त्रींनी बुमराहची तुलना दिग्गज शेन वॉर्न आणि वसीम अक्रम यांच्याशी केली.
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी20 विश्वचषकात बुमराहनं पाकिस्तानविरुद्धच्या साखळी सामन्यात आणि त्यानंतर फायनलमध्ये शेवटच्या षटकांमध्ये महत्त्वपूर्ण विकेट घेत सामना भारताकडे वळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. विजयासाठी 120 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची स्थिती तीन गड्यांच्या मोबदल्यात 80 धावांवर होती पण बुमराहनं खेळपट्टीवर वेळ घालवलेल्या यष्टीरक्षक रिझवानला क्लीन बोल्ड केलं. जो सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
2024च्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या 5 षटकांत 30 धावा हव्या होत्या आणि 6 विकेट शिल्लक होत्या, बुमराहनं 16व्या षटकात केवळ 4 धावा दिल्या आणि 18व्या षटकात मार्को जॅन्सनला बाद करुन दक्षिण आफ्रिकेवर दबाव निर्माण केला. बुमराहनं पूर्ण टी20 विश्वचषकात धारदार गोलंदाजी केली.
भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले की, “टी20 विश्वचषकात बुमराहसोबतचा त्यांचा सर्वोत्तम क्षण म्हणजे जेव्हा त्यानं यान्सेनला बोल्ड केलं. रिव्हर्स स्विंगच्या सहाय्याने बॅट आणि पॅडमधून चेंडू काढून यान्सेनला बोल्ड करणं ही मोठी कामगिरी आहे. मला वाटतं त्यावेळची ती खूप महत्त्वाची विकेट होती. तर शेन वाॅर्न, वसीम अक्रम आणि वकार यूनिस या खेळाडूंकडे चेंडूवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता होती. बुमराह सुद्धा याचं यादीतला आहे कारण त्याच्याकडे सुद्धा चेंडूवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
खेलिफआधी ‘या’ भारतीय महिला ॲथलिट्सवरही लागलाय पुरुष असण्याचा आरोप
विराट, धोनीच्या बॅट-जर्सीचा होणार लिलाव, केएल राहुल-अथिया शेट्टीनं उचललं मोठं पाऊल; होतंय कौतुक
रुममध्ये एसी नाही, भारतीय खेळाडू गर्मीनं हैराण; केंद्र सरकारनं उचललं मोठं पाऊल