भारताचा माजी दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवागनं (Virender Sehwag) कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमक खेळण्यासाठी खेळाडूंना सल्ला दिला आहे. कारण कसोटी क्रिकेटमध्ये रोमांच पाहायला मिळाला पाहिजे. तत्पूर्वी कर्णधार बेन स्टोक्स आणि मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडचा संघ प्रदीर्घ कसोटीमध्ये आक्रमक फलंदाजी करत आहे. जून 2022 पासून, इंग्लंड 4.61 प्रति षटकाच्या गतीनं धावा करत आहे. त्यावर सेहवाग म्हणाला की, इंग्लंडच्या बेसबॉल शैलीमुळे चाहते कसोटी क्रिकेटकडे आकर्षित झाले आहेत.
सेहवागनं एका कार्यक्रमात सांगितलं की, “इंग्लंड ज्या प्रकारे कसोटी क्रिकेट खेळत आहे, ते षटकात पाच धावा या गतीनं धावा करत आहेत. आमच्या खेळाच्या दिवसांमध्ये ऑस्ट्रेलिया संघ प्रति षटकात जवळपास चार धावा या गतीनं धावा करत होता. माझा नेहमीच विश्वास आहे की जर तुम्ही आक्रमण करु शकत असाल तर तुम्ही तुमच्या संघाला कसोटी सामने जिंकण्याची अधिक संधी द्याल.”
पुढे बोलताना सेहवाग म्हणाला, “आजकाल तरुणांना कसोटी क्रिकेटमध्ये जास्त रस आहे. त्यामुळे, जर टी20 क्रिकेटमुळे फलंदाजांना रेड बॉल क्रिकेटसाठी अधिक अनुकूल खेळ विकसित करण्यास मदत झाली तर ते खेळासाठी चांगले होईल. जर कोणी कसोटी क्रिकेटला अनुकूल असा आक्रमक खेळ खेळला तर हरकत नाही. लोकांनी स्टेडियममध्ये येऊन कसोटी क्रिकेट पाहावे अशी आमची इच्छा आहे. मी कसोटी क्रिकेटमध्ये 270 चेंडूत त्रिशतक ठोकले होते. आजचे खेळाडू एवढ्या चेंडूंचा सामना केल्यास 400 धावा करू शकतात.”
वीरेंद्र सेहवागच्या (Virender Sehwag) कसोटी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्ल बोलायचं झालं, तर त्यानं भारतासाठी 104 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 8,586 धावा केल्या. यादरम्यान त्याची फलंदाजी सरासरी 49.34 राहिली तर स्ट्राईक रेट 82.23 राहिला. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सेहवागनं 32 अर्धशतक, 23 शतक आणि 2 त्रिशतक ठोकले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 319 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs SL भारताविरुद्ध कहर केलेल्या फिरकी गोलंदाजानं केला मोठा खुलासा, म्हणाला…
टेबल टेनिसमध्ये भारताचा धमाका, महिला संघ क्वार्टरफायनलमध्ये दाखल…!
3 भारतीय खेळाडू, ज्यांना श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी प्लेइंग 11 मधून बाहेर करण्यात यावं